Ads

वडिलांच्या हत्येचा साक्षीदार आहे 5 वार्षीय मुलगा

चंद्रपूर :-
16 मार्चला कोरपना तालुक्यातील मौजा पारधीगुडा येथील रहिवासी 38 वर्षीय रमेश परमदास नन्नावरे यांच्या त्यांची पत्नी सुरेखा नन्नावरे यांनी गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती.
सुरेखा या महिलेचे गावातीलच अश्विन नन्नावरे सोबत अनैतिक संबंध होते, या प्रेम प्रकरणातून सुरेखा अश्विनसोबत पर राज्यात पळून गेली होती.
तब्बल 8 महिने अश्विन सोबत राहिल्यावर सुरेखा गावी परतली मात्र घरी न जाता ती विलास राऊत यांच्या शेतातील गोठ्यात राहली.

Mastermind
सदर बाब गावातील पुढाऱ्यांना कळली तेव्हा या गोष्टीचा विरोध करीत कुटुंबातील मुलांचा विचार करता सुरेखा ला पतीसोबत रहायला सांगितले.
रमेशने सर्व विसरत सुरेखा ला स्वीकारले मात्र काही दिवसानंतर 15 मार्च ला पती-पत्नीत काही कारणावरून वाद झाला, मात्र वाद विकोपाला गेला असता दुसऱ्या दिवशी 16 मार्चला रमेश दारू पिऊन घरी आला त्यावेळी सुरेखा सोबत त्याचे भांडण झाले याचा राग मनात धरीत सुरेखाने रमेशचा गळा आवळून खून केला. Subspecies murder
वडिलांचा गळा आवळून खून करताना रमेशच्या 5 वर्षीय मुलाने डोळ्यासमोर बघितले होते.
सुरेखा अश्विन सोबत पळून गेल्याने रमेश खूप दुखावल्या गेला होता व ज्यादिवशी रमेशचा खून झाला त्यादिवशी अश्विन हा गावातच उपस्थित होता.
सुरेखा व अश्विन सोबत पळून गेले तेव्हा विलास राऊत ने दोघांना मदत केली होती, यावरून विलास राऊत, अश्विन नन्नावरे व रवींद्र पवार यांना सहआरोपी करीत अटक करावी अशी मागणी आदिवासी पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र शेरकुरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

Love affair
16 मार्च ला रमेशची हत्या झाली त्यावेळी अश्विन गावात होता, व दुसऱ्या दिवशी अंत्यविधी संपताच तो गावात परतला, या सर्व संशयास्पद बाबी पोलिसांनी पुन्हा तपासून बघितल्यास या हत्याकांडातील पडद्यामागील कलाकार पोलिसांच्या तावडीत सापडेलच. Chandrapur police
मृतक रमेशच्या 5 वर्षीय मुलाने वडिलांची हत्या होताना बघितले, आज तोच त्या हत्येचा साक्षीदार आहे.
आरोपी सुरेखा यांच्या कृत्यामुळे त्यांच्या मुलांवरून आई-वडिलांचे छत्र हरविले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment