Ads

आधुनिक पद्धतीचा वापर करून पीक पद्धती

ब्रम्हपुरी :- जागतिक महिला दिनाचे
औचित्य साधून गोसेखुर्द उजवा कालवा ब्रम्हपुरी विभागात पाणी वापर संस्थांच्या संचालक मंडळ व लाभधारक शेतकऱ्यांसाठी मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था, मुंबई विद्यापीठ आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने,प्रा.डॉ.सुरेश मैंद प्रकल्प समन्वयक मुंबई विद्यापिठ यांच्या मार्गदर्शनात "कृषी पुरक योजना व पीक पद्धतीत बदल"या कार्यशाळेचे आयोजन "हॉटेल न्यु सात बारा" येथे करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही चे कार्यक्रम समन्वयक *डॉ. विनोद नागदेवते,* फळबाग तज्ञ *डॉ.सोनाली लोखंडे,* दुग्धव्यवसाय व पशुपालन तज्ञ *डॉ.गणेश काळूसे, इंजि.स्नेहा बेलादी* गोसेखुर्द उजवा कालवा ब्रम्हपुरीचे उपकार्यकारी अभियंता *जितेंद्र मडावी साहेब,* उपविभाग क्रमांक ७ चे सहाय्यक अभियंता श्रेणी १ अभिनव चिमोटे साहेब,* उपविभाग क्रमांक ०८ चे सहाय्यक अभियंता
गिरासे साहेब, उपविभाग क्रमांक ०६ चे कनिष्ठ अभियंता सचिन बावनकर, उपविभाग क्रमांक ०५ चे कनिष्ठ अभियंता माने साहेब, आसोला मेंढा कालवे उपविभागाचे कनिष्ठ अभियंता मोकासे साहेब आणि *मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्थेचे सिनिअर फेलो डॉ.गणेश बडे साहेब, प्रकल्प स्तरीय समन्वयक शशांक रायबोर्डे साहेब उपस्थित होते. त्याचप्रमाणे ब्रम्हपुरी उजवा कालवा विभागातील २५* पाणी वापर संस्थांचे संचालक व लाभार्थी शेतकरी सुमारे *शेकडोचे वर प्रशिक्षणार्थी म्हनुन उपस्थित होते.या कार्यशाळेत जास्तीत जास्त संचालक महिलांचा सहभाग* होता.
यावेळी मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था, मुंबई विद्यापीठाचे प्रकल्प स्तरीय समन्वयक शशांक रायबोर्डे यांनी पाणी वापर संस्थानी पाणी घेणे आणि पाणीपट्टी वसुली करणे एवढेच कार्य मर्यादित न ठेवता पीक पद्धती मध्ये बदल करण्याच्या उद्देशाने कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे पाणी वापर संस्थांच्या पदाधिकारी यांना आव्हान करत कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. तसेच जलजागृती करण्याच्या दृष्टीने "जल प्रतिज्ञा" घेण्यात आली, तसेच जलजागृती निमित्त्याने विविध भिंती पत्रके लावून माहिती देण्यात आली.
गोसीखुर्द विभागाचे अधिकारी अभिनव चिमोटे साहेब यांनी पाणी वापर संस्था व विभाग यांच्यातील समन्वय या विषयावर भाष्य केले. लाभक्षेत्रात सुरू असणारे काम होत असलेला विलंब या बद्दल कारणमिमांसा केली.
जितेंद्र मडावी साहेब यांनी पाणी पट्टी वसुलीमधे पाणी वापर संस्थांनी कशाप्रकारे विभागाला सहकार्य करावे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ.सोनाली लोखंडे यांनी कृषी पुरक योजनाची माहीती देतांना सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या विविध याेजना असून लाभार्थी शेतकऱ्यांनी वैयक्तिक व पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून योजनांचा लाभ घ्यावा. कोणत्याही एकाच पींकावर अवलंबुन न राहता आधुनिक पद्धतीचा वापर करून पीक पद्धतीत बदल करने गरजेचे आहे.नंतर फळबागा लागवड व त्यांचे महत्व पटवून देताना माती परीक्षण करणे कसे गरजेचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले.
डॉ.गणेश काळूसे साहेब यांनी दुग्धव्यवसाय व पशुपालन केल्यास शेतीला जोडधंदा उभा राहू शकतो यावर मार्गदर्शन करताना या विषयातील असणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
इंजि.स्नेहा वेलादी यांनी सांगितले की, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा २००५ व नियम २००६ नुसार पाणी वापर संस्थेत महिलांचा सहभाग जेवढा महत्वपुर्ण असून तेवढाच महिलांचा शेती व्यवसायात सुद्धा सक्रिय सहभाग आहे.म्हनुन महिलांनी पीक पद्धतीत बदल करावा.
नंतर विषयाला अनुसरून पाण्याचे महत्व आणि त्याचे नियोजन. पाण्याचे पुनरभरण, पाण्याचे संवर्धन, पिकांची लागवड व संगोपन, शेतीमध्ये आधुनिक साधनांचा वापर, व शेतमालावर केली जाणारी प्रक्रिया व उद्योग या सर्व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ.गणेश बडे यांनी पाणी वापर संस्थांची गरज, महत्त्व आणि पाणी वापर संस्थाचे भविष्यातील फायदे यावर विशेष भाष्य करत पीक पद्धतीमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने पाणी वापर संस्था संस्था यांना शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) मध्ये परावर्तीत करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन केले.
डॉ.नागदेवते साहेब यांनी पीक बदल प्रक्रिया,धान बीजाचे प्रकार,पिकांचे नियोजन, पिकांचा कालावधी,धान पिकाचे आजार व त्यावर उपाय, उत्पादनांची विक्री बाजारपेठ आणि पाण्याची साठवण क्षमता, पाण्याचा योग्य वापर यावर विस्तृत भाष्य केले.
नंतर क्षेत्र भेट व अभ्यास दौरा आयोजित केला होता. प्रगतशील शेतकरी व हॉटेल न्यू सात बारा चे संचालक राम लाड यांनी स्वतःच्या शेतातील विविध पिकांची माहिती देतांना स्वतःची यशोगाथा सर्व उपस्थित शेतकऱ्यांना सांगितली. ज्यात पिकांची निवड ते बाजारपेठ इतक्या विस्तृत विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील अधिकारी वर्गाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याचे प्रात्यक्षिक दाखवत पावर टेलर बद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच या आधुनिक यंत्रांच्या खरेदीसाठी शासकीय योजना व सबसिडी किती असते त्यासाठी कोणत्या पात्रतेची गरज असते याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
या कार्यशाळेचे संचालन मुंबई अर्थशास्त्र व सार्व जनिक धोरण संस्थचे संजय इंगळे यांनी केले. तर क्षेत्रीय समन्वयक राहुल सिंगनजुडे यांनी आभार व्यक्त केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment