Ads

सामाजिक दुःख कवेत घेऊन काव्य निर्मिती व्हावी '.....डॉक्टर श्याम मोहरकर

भद्रावती तालुका प्रतिनिधी :- भद्रावती येथील स्वर्गीय वीणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान यांच्यामार्फत पाचवे विदर्भस्तरीय "स्मृतिगंध काव्य संमेलनाचे" आयोजन दिनांक 20 मार्च 2022 ला मुरलीधर पाटील गुंडावार सभागृह भद्रावती येथे संपन्न झाला . कार्यक्रमाचे उद्घाटक सुप्रसिद्ध समीक्षक ,नाट्यकर्मी ,निवृत्त प्राचार्य, डॉ. श्याम मोहरकर यांच्या हस्ते पार पडले .
स्वर्गीय वीणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान भद्रावती च्या वतीने पाचव्या विदर्भस्तरीय स्मृतीगंध काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या काव्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी माननीय विनय मिरासे (अशांत )यवतमाळ हे होते, तर उद्घाटक डॉ. प्राचार्य श्याम मोहरकर हे उपस्थित होते . ज्येष्ठ साहित्यिक ना. गो थुटे वरोरा ,चवथ्या काव्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. विद्याधर बनसोड चंद्रपूर ,विशेष अतिथी म्हणून डॉ. धनराज खानोरकर ज्येष्ठ साहित्यिक ब्रह्मपुरी, भद्रावती चे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल चटकी स्वर्गीय बापूराव टोंगे काव्य मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते .
स्वर्गीय वीणाआडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व ग्रंथाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. भद्रावती येथील ज्येष्ठ साहित्यिक झाडी बोली साहित्य मंडळ भद्रावती सचिव श्री. पांडुरंगजी कांबळे यांची "बायको पिरमाची " या कादंबरीचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वर्गीय वीणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रवीण आडेकर यांनी केले. पाचव्या कवी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ समीक्षक ,नाट्यकर्मी ,प्राचार्य डॉ श्याम मोहरकर यांनी मार्गदर्शन करतांना 'नवोदित कवींनी सामाजिक जाणिवांना आपल्या काव्याच्या कवेत घ्यावे ' असे आवाहन केले . अध्यक्ष श्री विनय मिरासे यांनी 'कवितेच्या प्रांतात दर्जेदार कविता निर्माण व्हाव्यात' असे मार्गदर्शन केले . उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्राध्यापक स्वाती गुंडावार यांनी केले , तर आभार प्रदर्शन डॉक्टर सुधीर मोते यांनी केले.
कवी संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात निमंत्रित कवींचे कविसंमेलन घेण्यात आले. याप्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून श्री विनय मिरासे ज्येष्ठ कवी, प्रमुख उपस्थिती डॉक्टर विजय
सोरते नागपूर ,जयवंत वानखेडे, किशोर मुगल आदी मान्यवर काव्य मंचावर उपस्थित होते . निमंत्रित कवी संमेलनात विदर्भ भूमीतून निमंत्रित केलेल्या 22 कवींनी आपले बहारदार काव्यवाचन करून रसिक, श्रोत्यांना रिझवीले , खिळवून ठेवले.यात नागपूर, हिंगणघाट, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील समस्त तालुक्यातील कवी सम्मिलित झाले होते .
कवी संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात खुले कवी संमेलन आयोजित करण्यात आले .खुल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुधीर मोते हे होते . तर प्रमुख अतिथी म्हणून भारती लखमापूर ,अंजुमन शेख, शालिक दानव,सुनील बावने काव्य मंचावर उपस्थित होते. त्यात विविध भागातून आलेले 70 कवींनी आपल्या काव्य वाचनाने सभागृहात काव्यमय रंग भरला . सकाळी 11.30 वाजता सुरू झालेला कार्यक्रम रात्री 9.00 पर्यंत चालला . ही स्मृती गंध काव्य संमेलनाची फलश्रुती आहे, असे उद्गार संयोजक प्रवीण आडेकर यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वर्गीय वीणा आडेकर स्मृती प्रतिष्ठानचे समस्त पदाधिकारी, श्री अनिल
पिट्टलवार,डॉ. ज्ञानेश हटवार, विवेक महाकाळकर , प्रशांत उज्ज्वलकर, रमेश भोयर ,सु.वी. साठे तसेच विदर्भ साहित्य संघ शाखा भद्रावती येथील समस्त पदाधिकारी, झाडीबोली साहित्य मंडळ शाखा भद्रावतीचे समस्त पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment