Ads

भद्रावती येथे होणार ग्राहक मार्गदर्शन कार्यशाळा

Consumer Guidance Workshop to be held at Bhadravati
भद्रावती : शहरात मागील काही दिवसात ग्राहक पंचायत भद्रावती कडे ऑनलाइन फसवणूक, जमीन खरेदी-विक्री मध्ये झालेली फसवणूक, सहारा, पर्ल, मैत्री यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी येत आहे. ग्राहक पंचायत भद्रावती कडून नेहमी वर्तमानपत्र, सोशल मीडिया याद्वारे जनजागृती केली जाते. तरी देखील ग्राहकांची फसवणूक होतानाचे चित्र पाहायला मिळते.

१५ मार्च हा "जागतिक ग्राहक दिन"World Consumer Day " म्हणून सर्व जगात साजरा केला जातो. कारण ग्राहक हा देशाचीच नाही तर सर्व विश्वाची अर्थव्यवस्था चालवतो. म्हणून ग्राहकाला कोणी देव तर कोणी राजा म्हणून संबोधतो. तरी देखील अख्ख्या जगाची अर्थव्यवस्था चालवणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होताना दिसते.

जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून ग्राहक पंचायत, भद्रावती तर्फे दिनांक १३ मार्च २०२२ रोज रविवार ला विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथे समस्त भद्रावती वाशियांकरिता 'ग्राहक जनजागृती मार्गदर्शन कार्यशाळेचे'Consumer Guidance Workshop to be held at Bhadravati आयोजन केले आहे. यामध्ये ग्राहक संरक्षण कायदा, ऑनलाइन फसवणूक, आयोगाची कार्यप्रणाली, ग्राहक पंचायतीचे कार्य, ग्राहकांनी फसवणूक होऊ नये यासाठी काय करावे, फसवणूक झाल्यानंतर न्याय कसा मिळवावा याविषयी माहिती मिळणार आहे.

ग्राहक मार्गदर्शनासाठी ग्राहक तक्रार निवारण आयोग जिल्हा चंद्रपुर, अध्यक्ष (न्यायाधीश) मा. अतुल अळशी साहेब, कीर्ती गाडगे, कल्पना जांगडे आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांत अध्यक्ष मा. नारायण मेहरे साहेब उपस्थित राहणार आहे.

त्यामुळे ग्राहक पंचायत भद्रावती यांचे कडून सर्व भद्रावती करांना आवाहन करण्यात येत आहे की, दिनांक १३ मार्च २०२२ रोज रविवार ला ठीक ११:०० वाजता विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती येथे उपस्थित राहून ग्राहक मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ घ्यावा.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment