भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-
भद्रावती नगर परिषदेच्या क्षेत्रातील शिवाजी नगर दरबान सोसायटी, शास्त्री नगर मंजुषा लेआऊट गवराळा परिसरातील सांडपाणीवाहून नेणारी नाली थेट लोणार रिठावरील नाल्यास मिळत होती, मात्र अलीकडे स्थानिक महसूल व नगर परिषदेच्या प्रशासणाच्या दुर्लक्षित धोरणामुळे व अवैध मस्तवाल रेती तस्कराद्वारे तसेच भूखंड व्यावसाईकाद्वारे सांडपाणी वाहून नेणारी नालीच बुजविण्याचा प्रकार सुरू झालेला आहे. अवैध रेती वाहतुकीकरिता चक्क पाण्याचा प्रवाह रोखून रपटा तयार करण्यात आला,परिणामतः या रेल्वे लाईन व देवालय परिसरातील शेतजमिनीत रसायनयुक्त सांडपाणी शिरून शेतजमीन नापीक होत आहे, तसेच या भागातील सातपुते यांचे शेतीपासून ते डॉ. कुटेमाटे ते विंजासन परिसरातील शेतापर्यंत चक्क दुर्गंधी युक्त शेततळेतयार होऊन उपजाऊ शेतजमीन नापीक होत आहे.यासंबंधी गांभीर्याने दखल घेऊन ठोस अशी उपाययोजना तात्काळ करावी अन्यथा सांडपाण्याचा प्रवाह मंजुषा लेआऊट लगत रोखावा लागेल अश्या प्रकारचे लेखी निवेदन परिसरातील त्रस्त शेतकऱ्यांमार्फत भद्रावती नगर परिषदेला देण्यात आले. याप्रसंगी भद्रावतीचे नगराध्यक्ष मा. अनिलभाऊ धानोरकर यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यांच्या आश्वासक निर्देशाचे संबंधित त्रस्त शेकऱ्यांनी आभार मानले.
या शिष्ठमंडळामध्ये परिसरातील शेतकरी सचिन कुटेमाटे,संजय सातपुते, लिमेश माणुसमारे,व
परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment