Ads

नगरसेवक नागरकर यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यास पोलिसांना आले यश .

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगर पालिकेचे काँग्रेस नगरसेवक (Congress Corporator) हल्ला प्रकरणातील आरोपी अखेर गवसले आहेत. 4 मार्च रोजी सकाळी मॉर्निंग वॉकवरून परतणाऱ्या नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर 3 युवकांनी क्रिकेट बॅटने हल्ला (Attack)केला होता.
राजकीय नेत्यावरील या हल्ल्यानंतर राजकीय, प्रशासकीय वर्तुळ हादरले होते. पालकमंत्री, खासदार व भाजप नेते मुनगंटीवार यांनी पोलीस महासंचालकांपर्यंत हल्ल्याची तक्रार केली होती. चंद्रपूर पोलिसांनी 4 तपास पथके तयार करून बुरखाधारी 3 युवक आणि दुचाकीचा शोध घेत होते. पोलिसांवर असलेल्या प्रचंड दबावानंतर आता तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. शानु उर्फ आसिफ अली आशिक अली (26), राजेश केवट (20), महाकाली कॉलरी निवासी सुमित बहुरिया (22) अशी अटक (Attacker arrested) केलेल्या आरोपींची नावे असून हे तिघेही रय्यतवारी कॉलरी येथील निवासी आहेत.

नागरकर यांनी हटकल्याच्या रागातून त्यांच्यावर हल्ला घडला, प्राथमिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी कोहिनुर मैदानावर युवक cricket खेळत असताना नगरसेवक नागरकर यांना बॉल लागला, एका युवकाने तात्काळ नागरकर यांच्याजवळ जात, "अंकल सॉरी, गलतीसे आपको बॉल लग गया" असे म्हटले मात्र नागरकर यांनी युवकाचे काही न ऐकता शिवीगाळ करीत युवकाला 2 कानशिलात लावल्या. मात्र त्यानंतर युवक काही न बोलता निघून गेला. त्याचा राग मनात ठेवून नगरसेवक नागरकर यांना तिघांनी लक्ष्य केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. नागरकर यांच्यावर पाळत ठेवून हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोपी 26 वर्षीय सानू उर्फ आसिफ अली आशिक अली रा. BMT चौक रयतवारी कॉलरी, 20 वर्षीय राजेश उर्फ आर. के. अर्जुन केवट रा. रयतवारी कॉलरी, 22 वर्षीय सुमित दयाशंकर बहुरिया आनंदनगर महाकाली कॉलरी यांना 7 मार्चला अटक व जामिनावर सुटका करण्यात आली. सदर प्रकरणात स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शहर पोलीस ठाणे गाठत प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment