Ads

अखेर अपंग बंडुला घरकुल मिळालेच. आठ वर्षाच्या संघर्षांला पुर्णविराम.



दुर्योधन घोंगडे , पोंभूर्णा :-
मोठ्या घराचे स्वप्न सर्वच बघतात,परंतु वेळव्यातील अपंग बंडू शासकीय घरकुलाचे छोटेसे स्वप्न बघत होता. खेटे घालूनही मागील सात-आठ वर्षापासून तेही पूर्णत्वास येईना. अखेर आता अपंग बंडूचे शासकीय घरकुलाचे छोटेसे स्वप्न पूर्णत्वास आले आहे. शारीरिक दृष्ट्या अपंग बंडू मलन्ना कावटवार वडिलांसाठी घरकुलाचे स्वप्न बघत होता .In the end, Apang Bandu got a house.
त्याच कारणास्तव बंडू मागील सात-आठ वर्षापासून अधिकारी, पदाधिकाऱ्यांसह पंचायत समिती कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत राहीला. शेवटी यावर्षी त्याच्या वडिलांच्या नावे प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल मंजूर झाल्याने बंडूचे स्वप्न पूर्ण होणार आहे.An end to eight years of struggle.

वेळवा (माल) येथील मलन्ना आसन्ना कावटवार यांची २०१६-१७ पासून घरकुलाची मागणी प्रलंबित होती. मुलगा बंडू अपंग तरीही संपूर्ण यंत्रणेची भेंट घेऊन आपल्या कुटूंबाची राहण्याची व्यथा सांगत होता. अधिकारी, पदाधिकाऱ्यांची निरंतर भेंट घेत होता. वेळवा ते पोंभूर्णा ५ किमी. चे अंतर अपंग असुनही पायी चालत जाऊन पायी घरी वापस येत होता. प्रधानमंत्री आवास योजनेअंर्गत घरकुल मंजुरीसाठी पंचायत समिती पोंभूर्णा तथा पंचायत समिती पदाधिकाऱ्यांमार्फत सुध्दा वारंवार आवश्यक ती कार्यवाही करून पाठपुरावा करण्यात येत होता. ग्रामपंचायत वेळवा कडून प्रपत्र अ ब क ड यादी प्राप्त करून प्राप्त यादी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपुर कडे सादर करण्यात आली.

शेवटी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपुर यांचेकडून प्रधानमंत्री आवास योजना सन २०२१-२२ अंतर्गत घरकुल मंजूर यादी व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यामुळे, क्षेत्रिय अधिकारी यांचे मार्फतीने मोका चौकशी व स्थळ पंचनामे करण्यात आले. ग्रामपंचायत वेळवा व लाभार्थी मलन्ना आसन्ना कावटवार यांचे कडून आवश्यक ती कागदपत्रे व दस्ताऐवज तपासणी करून मलन्ना आसन्ना कावटवार हे घरकुल मिळण्यास पात्र झाल्यामुळे दिनांक ९ मार्च रोजी अपंग बंडूच्या आग्रहाखातर सभापती अल्का आत्राम, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, गंगाधर मडावी, सह गटविकास अधिकारी धनंजय साळवे, सप्रअ किरण वाढई, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी रश्मी पुरी, कनिष्ठ लेखा अधिकारी महाजन, वेळवा सरपंच्या सिमा निमसरकार, इत्यादी मंडळी मलन्ना आसन्ना कावटवार यांच्या घरकुल भुमिपुत्र कार्यक्रमास उपस्थित होती. त्यावेळी अपंग बंडूच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्वजण जवळून पाहत होते. बंडुच्या आठ वर्षापासुन च्या घरकुल च्या संदर्भात असलेल्या संघर्षांला अखेर पुर्णविराम मिळाला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment