Ads

जटपुरा प्रभाग-७ मध्ये विधानपरिषद आ. डॉ. रामदासजी आंबटकर यांच्या निधीतून अभ्यासिकेच्या कामाचे भूमिपूजन

चंद्रपुर :-आज दिनांक 20 मार्च रोजी चंद्रपूर महानगरातील जटपुरा प्रभाग-७ मध्ये विधानपरिषद सदस्य आ. डॉ. रामदासजी आंबटकर यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या अभ्यासिकेच्या कामाचे भूमिपूजन आ. रामदासजी आंबटकर यांचे हस्ते पार पडले.
भाजपप्रणित चंद्रपूर महानगरपालिकेने गेल्या पाच वर्षांत लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात शहरामध्ये विविधांगी विकासकामांची मालिका तयार केली आहे. चंद्रपूर शहराचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी मनपा सातत्याने विकासकार्ये करते आहे. त्या माध्यमातून नागरिकांना शहरातच अनेक सुखसोयी आज उपलब्ध होत आहेत. हे निश्चितचं उल्लेखनीय आहे.
आ. रामदासजी आंबटकर यांच्या विकास निधीतून आणि स्थानिक नगरसेविका सौ. छबुताई वैरागडे यांच्या पुढाकाराने आज जटपुरा प्रभागात स्थानिक श्रीमहादेव-हनुमान मंदिर परिसरात ही अभ्यासिका होणार आहे. हे शैक्षणिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे आहे. प्रभागातचं सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना हिताचे व सोयीचे होईल.

कार्यक्रमाला मंचावर, उपमहापौर राहुल पावडे, भाजपा महानगराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे , झोन सभापती सौ. छबुताई वैरागडे, भाजयुमोचे महानगराध्यक्ष विशाल निंबाळकर, महानगराचे कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, मंडळाचे अध्यक्ष रवी लोनकर, माजी वनाधिकारी अरूणजी तिखे आदींसह प्रभागातून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment