Ads

भजन किर्तनात समाज प्रबोधनासह परिर्वतनाची ताकत - आ. किशोर जोरगेवार.

चंद्रपुर :-महाराष्ट्र हि संताची पवित्र भुमी आहे. याच भुमितुन संतानी भजन किर्तनाच्या माध्यमातून व्यसमुक्ती, तंटामुक्ती, रुढी पंरपरा याबाबत प्रबोधन करत समाजाला दिशा देण्याचे काम केले. भजन किर्तनात समाज प्रबोधनासह परिर्वतनाची ताकत असून येत्या काळात आपण शहरातील विविध मंदिरांमध्ये 1 हजार 8 भजन मंडळांचा महोत्सव घेणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

महाशिवरात्री निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अंचलेश्वर मंदिर प्रांगणात सर्व भाषीय १०० भजन मंडळांचा ४ दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज या भजन महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्वप्रथम शंखनाथ करून महादेवाची पूजा अर्चना करण्यात आली. या प्रसंगी प्रवर्तक संत श्री. मनीष भाईजी महाराज, वढा विठ्ठल मंदिरचे स्वामी चैतन्य महाराज, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळचे जिल्हा सेवाधिकारी अँड. दत्ताभाऊ हजारे, मानव उत्थान सेवा केंद्राच्या साधवी कांताबाईजी, स्वग्रामगीताचार्य जिल्हा प्रचार प्रमुख दादाजी नंदनवार यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, दुर्गा वैरागडे, आदि मान्यवरांची प्रमूख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना आमदार जोरगेवार म्हणाले कि, भजन हे योगसाधनेतील भक्तियोगाचा भाग आहे. भजन ही महाराष्ट्रातील एक लोककला आहे. पूर्वीच्या संतपरंपरेतील श्री संत ज्ञानेश्वर,तुकाराम,सोपान,निवृत्ती,एकनाथ, नामदेव, चोखामेळा इत्यादी संतांनी अनेक भजने तयार केलीत. टाळ, मृदंग, किंवा पखावज या वाद्यांच्या साथीत ईश्वर गुणवर्णनपर व नामस्मरणपर करीत या भजनातून समाजाला आधात्माकडे वळवत समाज प्रबोधनाचे काम केले. त्यानंतर महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने भजनगायनाची परंपरा सुरू ठेवत ती पूढे नेली. आज ती प्रत्येक घरात पोहचली आहे. आता अनेक भजन मंडळे तयार झाली असून ते हा वसा पूढे नेण्याचे काम करत आहे. खरतर कुटुंबातील वाढते ताणतणाव, भांडण, मानसिक अशांततेतून परमार्थ शोधण्यासाठी तसेच संस्कृतीचा समृद्ध मार्ग जोपासण्यासाठी भजनाचा मार्ग.हा उत्तम पर्याय असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

महाशिवरात्रीनिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलेल्या या आयोजनात सहभागी झालेले भजन मंडळे चांगल्या समाजाच्या निर्मितीचे काम करत आहे. खर तर एक दिवसीय भजन महोत्सव घेण्याची आमची संकल्पना होती. मात्र यात भजन मंडळांच्या मिळालेल्या उत्स्फूत प्रतिसादामूळे हे चार दिवसीस विविध भाषिय 100 भजन मंडळांचे महोत्सव पार पडत आहे. विकास कामे होत असतांना धार्मीक क्षेत्रांचा विकास झाला पाहिजे ही पण आपली भुमिका राहिली आहे. आपण वढा तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्नशिल असून या क्षेत्राचा पर्यटनदृष्टा विकासासाठी 44 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. माना टेकडी येथील जगनाथ बाबा मठाचेही सौदर्यीकरण आपण करीत असून निसर्गाच्या सानिध्यात असलेले सर्व सोयी सुविधायुक्त एक सुंदर मठ तेथे तयार झाले आहे. आजचा हा भजन महोत्सव चांगल्या समाजाच्या निर्मितीकडी एक पाउल असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात प्रवर्तक संत श्री मनीष भाईजी महाराज यांनी कैलास के वासी नमो बार बार हो हे भजन गायत संपूर्ण वातावरण भक्तीमय केले. यावेळी चंद्रशेखर देशमूख, यंग चांदा ब्रिगेडच्या युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, सविता दंडारे, सायली येरणे, विमल कातकर, वैशाली मेश्राम, अस्मिता डोणारकर, कौसर खान, आशू फुलझरे, आशा देशमूख, कल्पना शिंदे, मुन्ना जोगी, नकुल वासमवार, वंदना हजारे, नंदा पंधरे, वैशाली मद्दीवार, संगीता विश्वोज्वार, चंदा ईटनकर, हेमलता पोहनकर, कल्पना मंडळ, रिंकू मंडळ, शोभा पाल, यांच्या सह भजन मंडळांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सदर महोत्सव ४ मार्च पर्यंत चालणार असून नागरिकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment