मुल प्रतिनिधि : महाशिवरात्रीच्या निमित्ताने मार्कन्डा देवस्थान गडचिरोली येथे काल दिनांक ०१ मार्च ला गेलेला युवक आज ०२ मार्च २०२२ ला सकाळी ९:४५ वाजताच्या दरम्यान चंद्रपूर-मूल मार्गावरील नागाळा येथे आपल्या घरी परतत असतांनाच वाटेतच दुचाकीवरून नियंत्रण सुटल्यामुळे एका झाडाला जबर धडक दिली या अपघातात सदर युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार नागाळा येथील निवासी असलेला दीपक खोब्रागडे वय-२९ वर्ष हा महाशिवरात्रीच्या निमित्ताने काल मंगळवारी ०१ मार्चला चामोर्शी तालुक्यातील मार्कन्डा येथे आपल्या दुचाकी क्रमांक. MH 34 AR 5240 देवदर्शनासाठी गेला होता तिथे रात्रभर मुक्काम करून आज सकाळी आपल्या गावाला परतत असतांना जाणाळा बसस्थानकाजवळील एका झाडाला दुचाकीची जबर धडक बसल्याने सदर युवक घटनास्थळीच ठार झाला या संदर्भातील पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment