Ads

समाजात संघर्षमय जीवनात धडपडताना पाठीवर कौतुकाची थाप हवी...मृणाल गंगशेट्टीवार

While struggling in the struggling life in the society, one should have a pat on the back .Mrinal Gangshettiwar
चंद्रपुर :- हृदयी अमृत नयनी पाणी स्त्री जन्माची ही करून कहाणी ही पुरुषप्रधान संस्कृतीची देणं असून ही महिला आपल्या कार्यकर्तृत्वाने आपले अस्तित्व सिद्ध करतात तेव्हा समाजाने त्यांना हतोत्ससाहित न करता त्यांच्या कार्यकौतुकाची पावती स्वरूपात शाबासकीची पाठीवर थाप लाभल्यास महिला प्रगतीपथावर पोचतील असे प्रतिपादन चंद्रपुरातील भारतीय नृत्यकला प्रशिक्षिका व मार्गदर्शिका मृणाल गंगशेट्टीवार यांनी त्याच्या सत्काराला उत्तरं देताना मनोगत मांडले.
मदतीचा हात व विकलांग सेवा संस्थाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील सामाजिक, सांस्कृतिक व उद्यमशील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभात मृणाल गंगशेट्टीवर,वैष्णवी कथलकर ,शीतल इटनकर,स्नेहा मानकर,नाट्य कलावंत साधना शेलार चव्हाण ,मानवाधिकार कार्यकर्त्या निशा धोंगले, संगीता ठोसरे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुछ व मानपत्र देवुन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी रक्तदान चळवळीतील योद्धा सुभाष तेटवार यांचा ७० वेळ रक्तदान केल्याबद्दल तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप अडकीने यांनी गरजू महिलेला आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांनाही कृतज्ञता सत्कार स्वरूपात भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमात इंजिनिअरिंग कालेजचे प्रा राजेश पेचे द्वारा एका गरजू विद्यार्थिनीला नवीन सायकल मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या शोभा खोडके,रवी चव्हाण,ललिता मुफकलवार, प्रसाद पा न्हेरकर ,रवी चव्हाण ,सुभाष तेट वार,देवरावजी कोंडेकर, पूजा पा न्हेरकर ,इंजि चव्हाण इत्यादींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सांगता निशा धोंगले ह्यानी इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना ह्या प्रार्थना गीताने झाली .कार्यक्रम यशस्वीसाठी खुशाल ठलाल, पूजा तिवारी,अनुराधा मेश्राम यांचे सहकार्य लाभले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment