सिंदेवाही प्रतीनिधी:-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत 8 मार्च पासून उपजीविका वर्ष 2022-23 महाजीविका अभियान शुभारंभ राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. हसन मुश्रीफ साहेब व ग्रामविकास राज्य मंत्री मा. अब्दुल नबी सत्तार साहेब व उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर साहेब यांच्या उपस्थतीत राज्य स्तरावरून करण्यात आले. याचे थेट प्रसारण ऑनलाईन पद्धतीने पंचायत समिती सभागृह, सिंदेवाही येथे घेऊन महजिविका अभियान शुभारंभ करण्यात आला . या अभियान काळात जास्तीत समूहातील महिलांना विवीध योजनांच्या माध्यमातून लाभ देऊन उपजिविका उपक्रमात वाढ केल्या जाणार आहे.
यावेळी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती सिंदेवाही येथे जागतिक महीला दिन साजरा करण्यात आला. यामध्ये उमेद अभियानात काम करणाऱ्या महीलानी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच तालुक्यातील गाव स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या समूह संसाधन व्यक्ती, रत्नमाला वाघमारे,. विद्याताई गोटेफोडे संघवती गेडाम, पुष्पा पेंदाम, कृषीसखी- सुलोचना निमजे , पशुसखी अरुणा नन्नावरे,बँकसखी- प्रियंका जितेंद्र कामडी , रोहिणी नागोसे, CTC विनिता बोरकर यांना अभिनंदन व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
सदर महिला दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित मंदाताई बाळबुदे पंचायत समिती सभापती, . शिलाताई कन्नके पंचायत समिती उपसभापती, संजय पुरी गटविकास अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही, यांची महिलांना संबोधित केले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक नागरे तालुकाअभियान व्यवस्थापक उमेद यांनी केले तर संचालन ज्ञानेश्वर मलेवार व आभार प्रदर्शन सचिन लोधे कुषी व्यवस्थापक यांनी केले कार्यक्रम यशस्वितेसाठी उद्धव मडावी तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक संदिप उईके. सविता उईक. प्रफुल मडावी. प्रभाकर मानकर CFM मयूर खोब्रागडे CLM , यांनी परिश्रम घेतले यावेळी संपूर्ण तालुक्यातील समूह संसाधन व्यक्ती (ICRP ) CTC, पशुसखी, कृषिसखी, बँकसखी यांचा सहभाग होता .
0 comments:
Post a Comment