Ads

तालुक्यात मुरूम तस्करांचे "हौसले बुलंद"...!

ब्रम्हपुरी (सुभाष माहोरे ):-तालुक्याला लागलेले अवैध गौणखनिज उत्खननाचे ग्रहण उग्ररुप धारण करतांना दिसून येत असून, कुठलीही रॉयल्टी नसतांना शहराच्या मध्यवर्ती व तहसील कार्यालयाचा आवरातून सायगाटा परिसरातील शेकडो ब्रास अवैध मुरूमillegal transportation of Murum वाहतूक शहरातील प्रतिष्ठितांसाठी होतं असतांना काही प्रमाणात होतं असलेली तस्करी आजघडीला शतप्रतिशत प्रमाणात सुरु असल्याने तालुका महसूल प्रशासन अक्षरश"वसुलीप्रशासन"Recovery administrationझाल्याचे सर्वत्र बोलले जातं आहे.
एरवी छुप्या मार्गाने तस्करीला उधान, रात्रीच्या काळोखात अवैध तस्करी, नाममात्र परवानगी मिळवीत अवैध तस्करीला चालना अशा प्रकारचे कित्येक तस्करीचे प्रकार तालुक्याने बघितले आहेत मात्र ब्रह्मपुरी शहरापासून पाच ते सात कि.मी अंतरावर असलेल्या सायगाटा गावानजीक दिवसाढवळ्या जेसीबी व इतर मोठ्या यंत्राद्वारे कुठलीही रॉयल्टी न घेता तहसील कार्यालयाचे आवार ते शहराच्या मध्यवर्ती भागातून अवैद्य मुरूम तस्करीतील ट्रॅक्टर व टिप्पर भरधाव वेगाने शहरातील नामांकित लोकलाज विसरत लोकप्रतिनिधीत्वाचा बुरखा घातलेल्या व्यक्तींच्या प्रतिष्ठानांवर जात असल्याचे शहरवासी उघड्या डोळ्याने बघत आहेत.

तीन महिन्यापूर्वी मालडोंगरी परिसरातील दोन गटातून माफक शंभर ते दीडशे ब्रास परवानगी मिळवीत वाट्टेल त्या तीन ते चार गटातून अंदाजे एक हजार ब्रास मुरूम तस्करी च्या नंगानाचाने हिम्मत बळावल्याने मुरूम तस्करांनी सायगाटा येथे कुठलीही मुरूम उत्खनन परवानगी न घेता तसे परवानगी नसल्याबाबत त्या साजाचे तलाठी स्पष्ट करीत असतांना कुणीचं कारवाई करण्यासाठी धजावत नसणे म्हणजेच "जब सैंया भये कोतवाल तो डर काहे का "...! अशी अवस्था आजघडीला तालुक्यातील नागरिकांना स्पष्टपणे दिसून येत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment