Ads

माजी आमदार अतुल देशकर यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या

ब्रह्मपुरी:- (सुभाष माहोरे )ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अतुल देशकर हे रुई येथे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले असता निलज, रुई , पाचगाव, खरकाडा, गांगलवाडी, गोगाव, बरडकीन्ही, मूई, चिंचगाव, आक्सापुर, हळदा येथील शेतकऱ्यांनी धान पिकाकरिता आवश्यक असलेला कृषी पंपाचा अनियमित पुरवठा व भारनियमन याची समस्या देशकर यांच्याजवळ मांडली .
धान पिकाकरिता विजेचा प्रश्न गंभीर असल्याने शेतकऱ्यांना बारा तास वीज पुरवठा करण्यात यावा, धडक सिंचन योजनेचे अनुदान त्वरित मिळावे, धनाजी चुकारे देण्यात यावे, धानाला बोनस मिळावा, रणमोचन फाट्यावरील पुरात वाहून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम त्वरित करावे, उन्हाळी भात पिकाच्या लागवडीकरिता गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात यावे आदी मागण्या घेऊन पाच एप्रिलला भाजपाच्या वतीने नदी घाट टी पॉईंट गांगलवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे अतुल देशकर यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कृष्णा सहारे पंचायत समिती माजी सभापती रामलाल दोनाडकर अरुण शेंडे डॉ.जी एम बालपांडे राजेश्वर मगरे संजय कार हिरामण तिवाडे हिरामन चापले ज्ञानेश्वर भोयर सुजित बालपांडे सदाशिव ठाकरे मनोज मैंद आदी भाजप कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. पाच एप्रिल ला वैनगंगा नदी घाट पॉईंट गांगलवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्याबाबत चे निवेदन वीज वितरण विभाग, पोलीस स्टेशन, उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांना देण्यात आले. रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment