भद्रावती :- "राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे विद्यार्थ्यांच्या मनावर सेवेचे संस्कार करणारी कार्यशाळा आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या समस्या समजून घेऊन पुढे शिक्षण झाल्यावर त्या कशा सोडवता येईल याचा विचार करावा असे विचार विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा चे सदस्य जयंत टेमुर्डे यांनी व्यक्त केले.ते भद्रावती तालुक्यातील पिंपरी (देशमुख) येथे दि.२५ ते ३१ मार्च दरम्यान आयोजित विवेकानंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाचे अतिथी म्हणून बोलत होते . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते.यावेळी मंचावर प्रा. धनराज आस्वले,अर्चना नांदे, पंकज खटाले, एस. जी. मासळकर, सुनिता ठोंबरे, पंढरीनाथ कुटमाटे, संदीप कुटेमाटे, कृष्णा दर्वे , अमोल शिरसागर, काजल चव्हाण, सुरेश आस्कर, पुरुषोत्तम मत्ते, अण्णा कुटेमाटे, विठ्ठल मांडवकर, माधव कौरासे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ नामदेव उमाटे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, या सात दिवसीय शिबिरातील संस्काराचा ठेवा आयुष्यभर जपून ठेवावा. भावी जीवन जगत असताना तो तुमच्या कामी येईल. यानिमित्ताने शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्यावे असाही उपदेश केला. शिबिराच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment