Ads

*मोफत इंग्लिश स्पोकन क्लासची पहिली बॅच यशस्वी * First batch of free English spoken class successful

चंद्रपूर :- धनराज कोवे मित्र परिवार तर्फे १००० गरीब विद्यार्थ्यांना मोफत इंग्लिश स्पिकींग क्लास देण्याची सुरुवात दि. १९ फेब्रुवारी २०२२ पासून श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती प्रित्यर्थ करण्यात आली होती. ती १०० विद्यार्थ्यांची पहिली बॅच यशस्वीरित्या पार पडली First batch of free English spoken class successful  
 त्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ रविवार दि. २४/०४/२०२२ ला आदिवासी समाज मंदिर, इंदिरानगर मूल रोड चंद्रपूर येथे झाला. सदर कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. निरोप समारंभाचे उद्घाटन श्री. दिनदयालजी कावरे यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन श्री छत्रपती शिवाजी महाराज व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मालापन करण्यात आले तेव्हा दिप प्रज्वलन समाज सेवक श्री धनराज कोवे, श्री. मुन्ना गवळी सर, सौ. चंद्रकलाताई सोयाम नगरसेविका सौ. वंदनाताई जांभुळकर नगरसेविका, श्री. सुदर्शनजी नैताम श्री गंगाधरजी कुंटावार, श्री बंडूभाऊ पेंदाम श्री युवराज वरखडे सर, रजनी मॅडम, वैष्णवी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांचे स्वागत ज्ञानमंथन स्पोकन इंग्लिश क्लासच्या स्टॉप ने गुलाब पुष्प देऊन केले तेव्हा आपल्या मनोगतातून श्री गवळी सर यांनी संबोधन करतांना सांगितले की, इंग्रजी भाषा ही जागतीक भाषा असून ती अवगत करणे ही काळाची गरज आहे. ती येत नसेल तर स्पर्धेच्या युगात आपला टिकाव लागणार नाही करीता मोफत इंग्लिश स्पोकन क्लास हे गरीब विद्यार्थ्यांसाठी महत्वपुर्ण ठरत आहे. म्हणून धनराज कोवे यांचे आभार म्हाणावे तेवढे कमी आहे. श्री. दिनदयालजी कावरे यांनी इंग्रजी भाषचे मोफत क्लासेस घेण्यात येत असल्याचे प्रथमतः पाहण्यात येत असल्याचा आनंद व्यक्त करीत धनराज कोवे मित्र परिवार व ज्ञानमंथन क्लासेस चे कौतूक केले व सदर झोपडपट्टी परिसरातील गरजु गरीब विद्यार्थी स्पर्धेच्या युगात इतरांच्या तुलनेत मागे राहुनये करीता हा उपक्रम मिल चा पत्थर ठरेल असे कौतुकास्पद प्रबोधन केले. तेव्हा मोफत इंग्लिश स्पोकन क्लासचे विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगतातून आलेले अनुभव इंग्रजीतून स्पिच करीत सर्वांसमोर व्यक्त केले. तेव्हा उपस्थित विद्यार्थ्यांचे पालक आनंदी दिसत होते. म्हणून काही पालक ज्ञानमंथन व धनराज कोवे मित्र परिवाराबद्दल कृत्यगता व्यक्त करीत होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना धनराज कोवे यांनी सांगितले की, गरीब गरजू विद्यार्थी यांना मोफत इंग्लिश स्पोकन क्लासेस देऊन विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी भाषेची भिती दूर करण तसेच विद्यार्थ्याच्या सर्वांगिन विकासा करीता त्यांच्यात असलेल्या सुप्त गुणांना वाढविण्याचे दृष्टीने स्टेज शो, व्यक्तिमत्व विकास, ड्रामा, स्पिच करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. म्हणून काही विद्यार्थ्यांनी डान्स व ड्रामातून उपस्थितांचे मन मोहले. मोफत इंग्लिश स्पोकन क्लासेस घेण्याबाबतचा विचार जेव्हा मनात आला तेव्हा प्रश्न अनेक होते परंतु मित्र मंडळीच्या सहकार्याने ते शक्य झाले. ते प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे यश पाहून मन आनंदाने भरून आले आहे. हे सर्व शक्य झाले ते एका वाक्याने "एकमेकास सहाय्य करु अवघे धरू सुपंत" या विचाराने प्रेरीत होऊन लोकसहभागातून जनकल्याण करण्यासाठी मित्राच्या सहकार्यने करु शकलो. त्यात ज्ञानमंथनचे संचालक युवराज सर व स्टाफ यांचे अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन व मनोगत रजनी पुसे मॅडम, वैष्णवी नवघरे मॅडम, अश्विनि बगेले व तनूजा बागळे, दिग्विजय लटारे, लक्की कोवे, समर्थ कुकडे, देविकास साह यांनी केले. तर उपस्थितांचे आभार युवराज सर यांनी मानले.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment