चंद्रपुर :-चंद्रपूर शहरातील गोंडकालीन किल्ला परकोटाच्या संरक्षणासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक भितींची ग्रील चोरी झाल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला असून,
यासंदर्भात इको-प्रो च्या माध्यमातून सदर घटनास्थळ गाठुन पाहणी करण्यात आली. चोरी गेलेल्या ग्रिल च्या जागेवर उभे राहून संरक्षण भिंतिचे व ग्रीलची सुरक्षा करण्याची मागणी करण्यात आली.
चंद्रपूर शहराला गोंडकालीन इतिहासाचे वैभव लाभले आहे. गोंड राजांनी चंद्रपूरच्या संरक्षणासाठी परकोट बांधला. मात्र, काळाच्या ओघात हे परकोट क्षतीग्रस्त होऊ लागले होते. ही बाब लक्षात घेऊन इको प्रो ने 'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत किल्ला स्वच्छता अभियान राबवले. त्याची दखल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून घेतली होती. त्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून किल्ला परकोटाच्या संरक्षणासाठी या भिंतिच्या दोन्ही बाजूस आतून बाहेरुन 11 किमी लांब संरक्षण भिंत, त्यास ग्रिल लावण्याचे काम सुरु करण्यात आले. कोविड पूर्वी 8 किमी पर्यन्त या भिंतिचे काम पूर्ण झाले मात्र, कोविड मुळे यात खंड पडला. या दोन्ही भिंति मधून पाथ वे आणि सायकल ट्रैक प्रस्तावित आहे. मात्र, संरक्षक भिंतीच्या लोखंडी ग्रील आता चोरी जाऊ लागली आहे.Grill of protective wall of Gondkal fort Parakota in Chandrapur city stolen
मागील दीड-दोन महिन्यात एक-दोन करीत, पठाणपुरा गेट ते विठोबा खिडकी आणि पुढे बिनबा गेटपर्यंत संरक्षक भिंतीच्या लोखंडी ग्रीलची चोरी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी लोखंडी ग्रील उखडून काढण्यासाठी सिमेंटचे काँक्रिट देखील तोडण्यात आले आहे. मात्र आज विठोबा खिडकी ते बिनबा गेट दरम्यान अनेक ग्रिल चोरी गेल्याची माहिती मिळताच इको-प्रो च्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पाहणी करित ग्रिल ची सुरक्षा व चोरी करणारे यांचेवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात इको प्रो अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी भारतीय पुरातत्व विभाग ला माहिती दिली असून आणि यापुर्वीच पुरातत्व विभाग ने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आहे. त्यानंतरही काही ठिकाणी ग्रिल चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर इको प्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी कार्यकर्त्यांसह येथे भेट देऊन पाहणी केली. याबाबत पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन ऐतिहासिक वास्तु, संरक्षण भिंतिचे संरक्षण साठी मागणी करण्यात येणार आहे.
"आपला ऐतिहासिक वारसा, जतन-संवर्धन करण्यास सर्वाची सहकार्याची गरज आहे. याचे संरक्षण फक्त पुरातत्व विभाग किंवा प्रशासन करु शकत नाही, तर यासाठी लोकसहभाग सुद्धा तितकाच गरजेचा आहे. आपला ऐतिहासिक वारसा ही राष्ट्राची संपत्ती आहे, ऐतिहासिक साधनांची नासधूस करणे कायदयाने गुन्हा आहे. चोरी झालेल्या ग्रिल बाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी पोलीस विभागाला किंवा इको-प्रोला माहिती द्यावी असे आवाहन बंडू धोतरे यांनी केले आहे."


0 comments:
Post a Comment