Ads

“त्या” तरूणीची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशी द्या : भद्रावतीच्या संतप्त महिलांची मागणी

चंद्रपूर : भद्रावती येथे सोमवारी (4 एप्रिल) ला सकाळी अकराचे सुमारास सुमारे 25 वर्ष वयोगटातील एका अनोळखी तरुणीचा शिरच्छेद केलेला मृतदेह ढोरवासा पिपरी मार्गालगत सरकारी आयटीआय समोरील शेतशिवारात आढळून आल्यानंतर तब्बन तिन दिवसाचा कालावधी होऊनही " ना आरोपी मिळाले, ना तरूणीची ओळख पटली. त्यामुळे निदर्यीपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना शोधून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भद्रावती येथील शेकडों महिलांनी महिलांनी केली. आज बुधवारी (6 एप्रिल) ला सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील मुख्य मार्गाने कैंडल मार्च  candle march काढून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. शिवाय आरोपींचा शोध लागला नाही तर मोठे आंदोलन छेडण्याचा महिलांनी पोलिस प्रशासनाला इशारा दिला आहे.
सोमवारी (4 एप्रिल) सकाळच्या सुमारास भद्रावती येथील ढोरवासा ते पिपरी मार्गावरील सरकारी आयटीआय जवळील शेतशिवारात एका तरूणीचा डोके नसलेला मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला. शेतमालकाला मृतदेह दिसून आल्यानंतर त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. नग्नावस्थेतील मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन तपासाला सुरूवात केली. घटना होऊन तिन दिवसाचा कालावधी झाला. मात्र त्या तरूणीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले नाही. तसेच आरोपींचा शोध लागलेला नाही. किंबहुना या घटनेशी संबंधीत एकही पुरावा पोलिसांच्या हाती गवसलेला नाही. भद्रावती आणि चंद्रपूर पोलिस या घटनेचा तपास करीत असताना आरोपी आणि त्या मृतदेहाची ओळख पटत नसल्याने आज बुधवारी भद्रावती येथील संतप्त झालेल्या महिला रस्यिासवर उतरल्या. कॅडलमार्च काढून आरोपींचा शोध घेऊन फाशीची शिक्षा देण्याची मागणी केल्याने पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

सायंकाळी सातच्या सुमारास भद्रावती शहरातील नागमंदिरापासून महिलांनी त्या तरुणीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी कँडल मार्च काढला. शहरातील शेकड़ों महिला कैंडल मार्च आंदोलनात सहभागी झाल्या. हातात कँडल घेऊन शहरातील मुख्य मार्गाने निघालेला कॅडल मार्च भद्रावती शहराच्या स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळ विसावला. नारी के सम्मान मे भद्रावती मैदान मे, नारी शक्ती जिंदाबाद अशा गगनभेदी घोषणांनी भद्रावती शहर दणाणून गेले होते.

प्रवेशद्वाराजवळ त्या तरुणीला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेल्या
सुनिता खंडाळकर, सामाजिक कार्यकर्ते विशा बोरकर, नागेंद्र चटपल्लीवार, शुभांगी बोरकुटे, संदिप
जिवने, स्वाती चारी, तृप्ती हिरादेवे यांनी या घटनेबाबत आपल्या प्रतिक्रीया देताना आरोपी नराधमांच्या क्रूर कृत्याचा तिव्र शब्दात निषेध नोंदविला.
यावेळी पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नराधम आरोपींचा तत्काळ शोध घेऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी,The culprits should be immediately investigated and sentenced to death, तरुणीची ओळख पटविण्यात यावी, या गुन्ह्याचा खटला फास्ट ट्रैक कोर्टामध्ये चालविण्यात यावा, तसेच या प्रकरणाचा तपास सिआयडी संस्थेकडे देण्यात यावा मागण्या आंदोलन महिलांनी केल्या. पोलिसांनी प्रवेशद्वाराजवळ महिलांच्या मागणींचे निवेदन स्विकारले. आणि या घटनेचा तपास तातडीने पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त केला. जर पोलिसांनी या त्या तरुणीच्या मारेकऱ्यांना शोधून काढण्यास विलंब केला तर मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही या आंदोलनादरम्यान पोलिसांना दिला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment