चंद्रपुर :-चंद्रपूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० हा शहराच्या आतून जाणारा असून हा महामार्ग चंद्रपूर ते बल्लारशाह व चंद्रपूर ते गडचिरोली या महत्वपूर्ण शहरांना जोडतो. चंद्रपूर शहर हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथील लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. परिणामी शहर विस्तारित होत असून महामार्गाला लागून बर्याच वसाहती निर्माण झाल्या आहे. तसेच चंद्रपूरात साकार होत असलेले नवीन वैद्यकीय महाविद्यालय याच महामार्गावर आहे.
त्यामुळे ह्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक होत आहे. परिणामी या महामार्गावर अपघात होण्याची संख्याही वाढली आहे.
त्यामुळे यावर तोडगा म्हणून येथील वरोरा नाका उड्डाणपूल ते सावरकर चौक, सावरकर चौक ते बंगाली कॅंम्प जवळ असलेल्या आर. ओ. बी. (एम.ई.एल)ला जाणार्या रेल्वे लाईन पर्यंत उड्डाणपूलाचे बांधकाम करण्यात यावे. अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. नितीन गडकरी यांना केली आहे. या उड्डाणपुलाचे बांधकाम झाल्यास चंद्रपूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ९३० वरील जड वाहतूक कमी होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल असेही सदर निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
0 comments:
Post a Comment