Ads

जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात अनेकांचा बळी

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख शहरांपासून तर बहुतांश ग्रामिण भागामध्ये वाघांचा धुमाकुळ माजलेला आहे. मानव - वन्यप्राणी संघर्षात या जिल्ह्याचे नाव पहिल्या क्रमांकावर नोंदल्या गेले आहे. ज्या गावांमध्ये वाघाचे पाऊल कधी पडल्याचे ऐकीवात नाही अशा गावांमध्येही वाघांचा संचार वाढला असल्याने ग्रामिण क्षेत्रातील लोकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. पाळीव प्राण्यांची शिकार, लोकांवर सातत्याने होत असलेले वाघांचे हल्ले, या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणारे व गंभीरीत्या जखमी होणारे निर्दोष नागरीक पाहु जाता अशा घटनांवर निर्बंध घालण्याकरीता वनविभागाने नियोजनबध्द कारवाई, दक्षता घेऊन एका स्वतंत्रा पथकाचे गठन करून ठोस पावले उचलावित अशी सुचना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी केली आहे.Many Civilian killed in tiger attack in district 
गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या शरद बोपनवार व सुरज मत्ते यांची दि. 15 एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रूग्णालयात प्रत्यक्ष भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची विचारपुस केल्यानंतर या गंभीर घटनांवर चिता व्यक्त करीत हंसराज अहीर यांनी वनखात्याच्या वरीष्ठ अधिकाÚयांच्या एकंदर कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाघांचा संचार मानववस्तीकडे होत असल्याने संबंधीत अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या ठिकाणी ड्रोन व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांव्दारे वाघांच्या हालचालीवर नियंत्राण ठेवण्यास प्राधान्य द्यावे अशी सुचनाही त्यांनी केली आहे.
वाघांच्या हल्ल्यात नागरीक गंभीररित्या जखमी होत असतांनाही रूग्णालयात दाखल केलेल्या या रूग्णांना बघण्यास किंवा त्यांचे बयान नोंदविण्यास संबंधीत वनाधिकारी दिरंगाई करीत असल्याबद्दल नापंसती व्यक्त करतांनाच ही निष्काळजी म्हणजेच स्वतःची जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्रयांनी मृतक किंवा जखमींना केवळ अनुदान देवून चालणार नाही तर लोकांचा जीव वाचेल याचे नियोजन योग्य पातळीवर होण्याच्या गरजेवर भर द्यावा असेही त्यांनी यावेळी आवाहन केले. वरीष्ठांनी वाघांच्या हल्ल्यांच्या पाश्र्वभूमिवर केवळ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर मदार न ठेवता स्थानिक पातळीवरील वनविभागाचे अधिकारी व अन्य तत्सम अधिकाऱ्यांना प्रभावी उपाययोजनेसाठी उपयुक्त मार्गदर्शन
करतांनाच या परिसरात संचार करणाऱ्या वाघांचा सुरक्षीत स्थळी नेऊन बंदोबस्त करावा अशी सुचनाही हंसराज अहीर यांनी या पाश्र्वभूमिवर केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment