Ads

शरद पवार ह्यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भद्रावती येथे निषेध आंदोलन

भद्रावती तालुका प्रतिनिधी:- दि. 8/4/22 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा खा आदरणीय पवार साहेब ह्यांच्या मुंबई येथील सिव्हर ओक निवस्थानवर काही वाईट प्रवृत्तीच्या सांगण्यावरून भ्याड हल्ला करण्यात आला.Protest agitation at Bhadravati against the cowardly attack on Sharad Pawar's house
त्या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 9/4/22 ला भद्रावती शहर आणि तालुक ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भद्रावती येथील गांधी चैक जवळील महात्मा गांधी पुतळ्या जवळ भद्रावती चंद्रपुर जिल्हाचे राष्ट्रवादी युवा नेते मुनाज शेख ह्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले आंदोलन करते वेळी सदावर्ते ह्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या देशाचे लोकनेते तथा राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवायांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानी आज काही समाजकंटक माथेफिरूनीं दगडफेक केली. काल मा‌..न्यायालयाचा निर्णय आल्यावर काही एस.टी. कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून व गुलाल उधळून आनंद व्यक्त केला असतांना आज दगडफेक करण्याचे कारणच काय? आजपर्यंत नेत्यांच्या घरावर अशाप्रकारचे कृत्य पुरोगामी महाराष्ट्रात कधीच घडलेले नाही. महाराष्ट्र लोकनेते असलेल्या आदरणीय पवार साहेबांच्या घरावर अशाप्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असून याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.पोलिसांनी या दगडफेकी मागील करते करवते कोण याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी हि आग्राहाची भुमीका मांडली पवार साहेब ह्यांच्या घरावर . भ्याड हल्ला करण्यात आला ह्याच्या मागे मुख्य सुत्रदार कोण ह्याचा तपास घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असी मागणी मुनाज शेख यांनी केली यावेळी राष्ट्रवादी
तालुका अध्यक्ष सुधाकर रोहणकर असंघटीत कामगार जिल्हा अध्यक्ष फयाज शेख , अपंग सेल जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र ताजने , विधान सभा अध्यक्ष विलास नेरकर , शहर अध्यक्ष सुनिल महाले महीला विधान सभा अध्यक्ष किरण सालवी शहर महीला अध्यक्ष सबिया देवगडे, पनवेल शेडे, रवि नागपुरे, रोशन कोमरेडडीवार , आशिष लिपटे , प्रमोद वावरे, स्वपनिल', मुन्ना नरवडे , तसेच भद्रावती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment