Ads

सरडपार येथे ट्रक व दुचाकीचा अपघात

सिंदेवाही:-शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सरडपार येथे ट्रक व दुचाकी मध्ये शुक्रवार सकाळी 8.30 च्या दरम्यान अपघात झाला असून अपघातात मुलगी आचल मांदाडे ही गंभीर जखमी झालि आहे.
नागभीड तालूक्यातील गिरगाव येथील लग्नांचे स्वागत समारंभा आटोपोनू नवेगाव गडचिरोली गावाकडे कडे जात असताना सकाळी 9 वाजता सरडपार बस स्थानकाजवळ डांबर रोडचे काम सूरू असल्याने समोर एक ट्रक थांबले असल्याने दुचाकी चालक अशोक मादाडे ह्यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी क्र.एम एच 33 ए बी 3145 थांबवली या दुचाकी वर अशोक मांदाडे व त्यांच्या दोन मुली सोबत गावाकडे जात होते.दरम्यान त्याच वेळेस मागून येणारा ट्रक क्रमांक एम एच 34 ए बी 5942 च्या चालकाचे वाहना वरून नियत्रण सुटल्याने मागून दू चाकी ला धडक दिलि, धडके मुळे दु चाकी ट्रक चे समोरील भागात घुसली दुचाकी वर बसलेलि आचल मांदाडे 16 वर्ष ही ट्रक च्या बाजूने पडून तिचा पाय ट्रकच्या समोरच्या चाकात सापडल्याने पायाचे पूर्ण चेंदामेंदा होउन पायाला गंभीर दुखापत झाली सोबतच वडील अशोक मांदाडे 45 वर्ष ,बहीण मयुरी मांदाडे वय 15 वर्ष हीसुद्धा दू चाकी वाहनाने सोबत होती मात्र ते ट्रक च्या विरोधी बाजूला पडल्या मुडे दुखापत झाली नाही. ट्रकचालक भक्त प्रल्हाद पुरणपाल वय 52 वर्ष बल्लारशा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दुचाकी व ट्रकच्याअपघातामध्ये गंभीरजखमी झालेली इयत्ता 9 वी मध्ये शिकणारी कु. आचल मांदाडे हिला जखमी अवस्थेत उपचाराकरीता सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते. गंभीर जखमी असल्याने प्रार्थमिक उपचार करूण पुढील उपचाराकरीता चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. ट्रक चालकावर गुन्हा नोंदवून ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस स्टेशन सिंदेवाही करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment