चंद्रपुर :-आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या पाठपूराव्याला यश आले असुन मतदार संघातील तिन गेटेड साठवण बंधा-र्यांसाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. सदर बंधा-र्यांचे काम पुर्ण होताच पाणी साठवण क्षमता वाढणार असुन भूतळातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होणार आहे. याचा मोठा फायदा कपास, सोयाबीन, व भात उत्पादन शेतक-र्यांना होणार आहे
चंद्रपुर विधानसभा क्षेत्रात ग्रामीण भाग मोठा आहे. या भागात कपास, सोयाबीन, भात व इतर पिक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. उत्तम दर्जाच्या पिकांसाठी पाण्याची मुबलक प्रमाणात गरज आहे. त्यामुळे चंद्रपूर मतदार संघातील ग्रामीण भागात गेटेड साठवण बंधारे बांधण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली होती. सदर मागणीचा त्यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. चंद्रपूर मतदार संघातील मौजा मार्डा - देवाडा येथील स्थानिक नाल्यावर गेटेड साठवण बंधाराचे बांधकाम, मौजा सिदूर-सोनुर्ली येथील स्थानिक नाल्यावर गेटेड साठवण बंधाराचे बांधकाम आणि मौजा सिदूर-महाकुर्ला येथील स्थानिक नाल्यावर गेटेड साठवण बंधाराचे बांधकाम मंजुर करण्यात आले आहे. सहा कोटी रुपयातून सदर बंधाऱ्यांचे बांधकाम पूर्ण होणार आहे. या बंधा-र्यांमुळे पाण्याच्या साठवण क्षमतेत मोठी वाढ होणार असुन याने पाणी पातळी वाढणार आहे. या पाण्याचा वापर कपास, सोयाबीन, धान व इतर संपूर्ण पिक उत्पादक शेतक-र्यांना होणार आहे.
0 comments:
Post a Comment