Ads

तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या इसम वाघाच्या हल्ल्यात ठार

मुल :-मुल तालुक्यातील भादुर्णा येथील शेतमजूर खुशाल गोविंदा सोनूले (५४ ) हा काल दिनांक १५/५/२०२२ रोजी सकाळी १० वा. चे सुमारास जंगलामधुन तेंदूपत्ता गोळा करुन घरी परत येत असतांना वाघाने त्याच्यावर हल्ला करुन ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
कुटूंबाच्या उदरनिर्वाहा करीता तेंदुपान गोळा करण्यासाठी खुशाल सोनुले नेहमी प्रमाणे पहाटेच गांवापासुन काही दुर अंतरावर असलेल्या जंगला मध्ये जावुन घरी परत यायचा. घटनेच्या दिवशी खुशाल बराच वेळ होऊनही घरी परतला नाही. परीसरात घडत असलेल्या वन्यप्राण्यांच्या घटनामूळे कुटूंबियांसह ग्रामस्थांना शंका आली. खुशाल खुप वेळ होऊनही घरी परत आला नाही म्हणुन ग्रामस्थांनी खुशालची माहीती स्थानिक वन कर्मचाऱ्यास दिली. वन कर्मचाऱ्यास शंका आल्याने सदरची घटना वन परीक्षेञ अधिकारी घनश्याम नायगमकर आणि क्षेञ सहाय्यक पाकेवार यांना दिली. माहीती मिळताच वनाधिका-यांनी भादूर्णी गाठुन काही ग्रामस्थांना सोबतीस घेवुन जंगलात शोध घेतला, परंतु खुशालचा शोध लागला नाही. दरम्यान अंधार पडू लागल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी शोध कार्य थांबवुन आज (१६/५) सकाळ पासुन वनविभागाचे अधिकारी नायगमकर, पाकेवार, वनरक्षक ऊईके, पारडे, वट्टे आणि काही ग्रामस्थांनी शोधकार्याला सुरूवात केली तेव्हा मानवी अवयवाचे छीन्न विच्छिन्न तुकडे जंगलात काही दुर दुर अंतरावर दिसुन आले. सापडलेल्या मानवी अवयवांच्या तुकड्यांवरून खुशालला वाघाने हल्ला करून ठार केल्याचे निष्पन्न झाले. वाघाच्या हल्यात खुशाल मृत्यु पावल्याचे लक्षात येताच सदर घटनेची माहीती पोलीस स्टेशन अधिकारी सतिशसिंह राजपुत यांना दिली. घटनेची माहीती होताच पोलीस पथकाने घटनास्थळी जावुन पंचनामा व चौकशी करून छिन्न विच्छिन्न झालेले मृतक खुशाल सोनूलेचे पार्थीव शवविच्छेदना करीता उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. मृतक खुशाल सोनुले याचे पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. मृतक खुशालच्या कुटूंबियास तातडीची मदत म्हणुन वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर यांनी २५ हजार रूपये दिले. यावेळी क्षेत्र सहाय्यक पाकेवार, माजी सरपंच संतोष रेगुंडवार, वनरक्षक आणि काही ग्रामस्थ उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. जी.आर. नायगमकर यांनी मृतकांच्या नातेवाईकास तात्काळ २५,००० (पंचवीस हजार रुपये) आर्थिक मदत दिली
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment