Ads

आयुध निर्मानी रुग्णालय महाराष्ट्र राज्य शासनास हस्तांतरित झाल्यानंतर ही कामगारांना पूर्वी सारखाच लाभ मिळावा-कॉम्रेड राजू गैनवार

भद्रावती तालुका प्रतिनिधी:- देशातील संपूर्ण आयुध निर्मानी केंद्र शासनाने वेग वेगळ्या खासगी संस्थाना हस्तांतरित केल्या नंतर आता तेथील रुग्णालये महाराष्ट्र राज्य शासनाला देण्याची त्यांची तयारी आहे येथील निर्मनीतील कामगारांना ज्या सुविधा आता या रुग्णालया कडून मिळत आहे तश्याच सुविधा हस्तांतरणा नंतर मिळाव्या अशी मागणी माझी नगरसेवक व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड राजू गैनवार यांनी ऐका निवेदनाद्वारे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना केली आहे.
येथील आयुध निर्मानी म्युनिशन इंडिया लिमिटेड या कंपनीस हस्तांतरित केल्या गेली या निर्मानीत अधिकारी आणि कामगार मिळून जवळपास चार हजार कर्मचारी कार्यरत आहेत या कामगारांच्या उपचारासाठी निर्मानीच्याच परिसरात चाळीस खाटाचा दवाखाना सण १९७० मध्ये सुरू करण्यात आला या रुग्णालयात अधिकारी आणि कामगार निरंतर उपचार घेत आहे गंभीर रुग्णांना चंद्रपूर किंवा नागपूरच्या खाजगी रुग्णालयात निर्मनीच्या खर्चाने पाठविल्या जाते परंतु आता आयुध निर्मानीच खाजगी संस्थेला हस्तांतरित झाली आहे आता हे रुग्णालय सुद्धा महाराष्ट्र शासना कडे सुपूर्द करण्याची तयारी सुरू आहे
या संदर्भात तसा पत्रव्यवहार सुरू झाला असून आयुध निर्मानी कोलकत्ता बोर्डाचे संचालक यांनी दिनांक ३१ मार्च २०२२ ला प क्र ००१०/ डी एफ यु पी / एम आई येस सी / २०२२ शासनाला पत्र पाठवून आयुध निर्मनीचे रुग्णालय आपणाकडे हस्तांतरित करण्याची आमची तयारी असल्याचे म्हटले आहे यावर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाचे दिनांक ६ एप्रिल २०२२ ला जा क्र १९८३ --१९५ नागपूर उप संचालक आरोग्य सेवा याना पत्र पाठवून माहिती मागविली आहे
या पुढे आपणास पहिल्या सारखा उपचार मिळणार नाही अशी भीती अधिकारी आणि कामगार वर्ग बोलून दाखवीत आहे हे रुग्णालय जरी महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित झाले तरी त्याचा फायदा अधिकारी आणि कामगारांना पूर्वी सारखाच मिळावा अश्या आशयाचे निवेदन माझी नगरसेवक व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड राजू गैनवार यांनी राष्ट्रपती व पंतप्रधान याना पाठविले आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment