चंद्रपूर:-मूल चंद्रपूर मार्गावर अजयपूर येथे झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. Horrible accident
19 में ला रात्री 10.30 वाजताच्या सुमारास वडसा वरून चंद्रपूर ला लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रक क्रमांक Mh 31 cq 2770 व चंद्रपूर वरून मूल कडे जाणारा डीझल टँकर क्रमांक Mh 40 BG 4060 या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ट्रक ला आग लागली, आगीने बघता बघता भीषण रूप धारण केल्याने पूर्ण ट्रक व त्यामध्ये असलेले 9 जण जळून खाक झाले.
लाकूड भरलेल्या ट्रक मध्ये वाहनचालक 30 वर्षीय अजय सुधाकर डोंगरे, BTS प्लॉट, बल्लारपूर, 33 वर्षीय प्रशांत मनोहर नगराळे, 30 वर्षीय मंगेश प्रल्हाद टिपले, 25 वर्षीय महिपाल परचाके, 46 वर्षीय बाळकृष्ण तुकाराम तेलंग, 40 वर्षीय साईनाथ बापूजी कोडापे राहणार नवी देहली, 22 वर्षीय संदीप रवींद्र आत्राम रा. तोहोगाव कोठारी हे सर्व मजूर लाकूड उतरविण्यासाठी चंद्रपूरला येत होते. तर डीझल टँकर मध्ये वाहनचालक 35 वर्षीय हनिफ खान रा. अमरावती, कंडक्टर 35 वर्षीय अजय पाटील वर्धा दोघेही ट्रक मध्ये होरपळून मृत पावले.
0 comments:
Post a Comment