Ads

शिवसेनेच्या वाघिणीच्या धाडसामुळे ‘तिच्या’ आयुष्यात उगवली नवी पहाट.

चंद्रपूर :- जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील एका गर्भवती महिलेला प्रसूतीचा कळा सुरू झाल्या. त्या नंतर तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय गुंतागुंत असल्याने बाळ आणि आईचा जिवाला धोका असल्याचं सांगितलं. ती वेळ होती रात्री 12 वाजताची. डॉक्टरानी तिला चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवलं, गर्भवती महिलेच्या मैत्रिणीने चंद्रपुरात असलेल्या शिवसेनेच्या उपजिल्हा महिला समन्वयक निशा घोंगडे यांना भ्रमणध्वनी करून मदत मागितली.
काळाकुट्ट अंधार पसरलेला असताना ही शिवसेनेची ही वाघीण मदतीसाठी धावत थेट चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचली आणि त्या महिलेला रूग्णालयात दाखल करत डॉक्टरांना मदत करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी परिस्थिती कठीण असल्याचं सांगितलं. मात्र निशा यांनी डॉक्टरांना तुम्ही तुमचे प्रयत्न करा. चांगले किंवावाईट होईल, त्याची जबाबदारी मी घेते, असं म्हणत आश्वस्त केलं. निशा यांनी दाखविलेल्या हिमतीमुळे डॉक्टर देखील अवाक झाले. प्रसुतीगृहात त्या महिलेला भेटून सकारात्मक विचार करण्याचा सल्ला देऊन बाहेर निघत निशा या बाळंतपण सुखरूप होण्यासाठी प्रार्थना करत होत्या. काही वेळाने त्या महिलेची प्रसुती झाल्याची बातमी कानावर पडली. बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. खरंतर निशा या शब्दाचा अर्थ होतो रात्र. पण याच निशामुळे त्या गर्भवती महिलेच्या आयुष्यात नवी पहाट उजळली. त्या गोंडस मुलाला हातात घेताच निशा यांनी सुटकेचा श्वास घेतला. रात्रभर केलेली मेहनत कामी आल्याचं समाधान त्यांना वाटलं. त्या महिलेने शुद्धीवर येताच निशा यांचे आभार मानले. शिवसेनेच्या वाघिणीने केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत work done by Shiv Sena's Tigress is appreciated everywhere आहे. निशा या  दिवस रात्र न बघता मदतीला कसे धावून जातात, याचं मूर्तिमंत उदाहरण ठरल्या आहेत.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment