राजुरा / वरुर :- सोशल युथ क्लबच्या नावाने रोज जुगार बहाद्दरांची महफील सजत असल्याची माहिती चंद्रपूर पोलिसांना मिळाली होती, तसेच सदर क्लब हे रात्री 10 वाजल्यानंतरही बेधडक सुरू असायचे.
7 मे ला रात्री 11.30 वाजताच्या सुमारास अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी स्वतः आपल्या ताफ्यासह वरुर येथे दाखल झाले. Gambling club कारवाईच्या दरम्यान पोलीस व तिथे असणारे जुगार बहाद्दूर यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. यामध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्यांना दुखापती झाल्या, अतुल कुलकर्णी यांनी दंगा पथकाला पाचारण केल्यावर पोलीस क्लब मध्ये शिरले.
Police raid gambling den under social club name
पोलिसांनी तब्बल 85 जुगार बहाद्दरांवर कारवाई केली. युथ सोशल क्लब चे अध्यक्ष व्यंकटेश मल्लया तोटा, रा. तेलंगणा राज्यातील मंचरियाल यांच्याविरुद्ध यांना विरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला. व दोन आरोपी शेर श्रीकांत, श्रीनिवास गंगारेडी हे फरार झाले.
सदर कारवाईत 10 लाख 71 हजार 692 रोख रक्कम, मराझो कार अंदाजे किंमत 6 लाख रुपये, क्लासिकल पत्ते 555, मार्क केक नोट सोलुशन मशीन किंमत 7 हजार रुपये, डेल कंपनी चे मॉनिटर 5 हजार रुपये, सी.पी प्लस डीव्हीआर किंमत 5 हजार रुपये असा एकूण 16 लाख 88 हजार 692 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 85 जुगाऱ्यावर 4.5 महाराष्ट्र जुगार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून यातील आरोपी युथ सोशल क्लब अध्यक्ष वेंकटेश मल्लय्या तोटा वय 36. रा. तेलंगणा राज्यातील मंचिर्याल यांचेवर कलम 353, 332 शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, व शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे या नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तर यातील दोन आरोपी शेर श्रीकांत, श्रीनिवास गंगारेड्डी हे फरार आहे.

0 comments:
Post a Comment