चंद्रपूर :- शहरालगत असलेली सर्वात मोठी झोपडपट्टी एम.ई.एल.या प्रभागातील दाट लोकवस्ती आहे. त्या करीता दरदिवशी या परिसरातील मोठे नाले व छोट्या नाल्यांची सफाई होत राहायला पाहीजे. मात्र महिना महिनाभर सफाई होत नसेल तर परिणामी सर्वत्र घानीचा पसारा होणारच. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात डुकरांचा हौदोस वाढला आहे व नाल्या ची घान डुकरांनी पसरवली की त्यांची दुर्गंधीही सर्व आजु बाजूच्या घरापर्यंत जाते. त्यामुळे डास, मच्छर, माश्यांची पैदास दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
परिणामी सर्वत्र साथीचे रोग वाढण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यात पावसाळा सुरू झाल्याने पुन्हा जनतेच्या त्रासात वाढ झाली आहे.
कोरोनाची भयावह परिस्थिती अनुभवल्या नंतर पुन्हा साथीच्या रोगाचे रुग्णात वाढ होण्याची भीती जनतेला वाटत आहे. या बाबत मनपा झोन क्र. ३ बंगाली कॅम्प येथे व मनपा, चंद्रपूर येथे वारंवार निवेदने तक्रार केली आहे. परंतु संबंधीत अधिकारी या कडे लक्ष का देत नाही आहेत. असा प्रश्न निर्माण झाला आहे.
म्हणुन या निवेदनाला केराची टोपली दाखवणा-या अधिका-यांना परिसरातील जनतेला होत असलेल्या त्रासाची जानीव करुन देण्यासाठी निवेदनाद्वारे अखेरची विनंती मा. आयुक्त साहेब मनपा चंद्रपूर यांना भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष धनराज कोवे यांच्या मार्फत देण्यात आले. व येत्या सात दिवसात परिसरातील सर्व नाल्या व मोठे नाले यांची सफाईकरा अन्यथा डुकरांचा कळप मनपात सोडून जनतेला होत असलेल्या त्रासाची जानीव करुन देण्यात येईल. असा इशारा देण्यात आला. तेव्हा उपस्थित उत्तरभारतीय मोर्चा चंद्रपूर चे जिल्हाअध्यक्ष रुद्रनारायण तिवारी वार्ड अध्यक्ष प्रलय सरकार, मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, पप्पू बोपचे होते.
0 comments:
Post a Comment