चंद्रपुर :-राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यात आज चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश झाला असुन मागील 36 तसापासून सर्व प्रकारच्या राजकीय बातम्यांपासुन दुर्लक्षित असलेला चंद्रपूर जिल्हा आमदार किशोर जोरगेवारांच्या शिंदे गटात सामील होण्याने प्रसिद्धी झोतात आला असुन चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार अखेर शिंदेंच्या गळाला लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
ह्या संदर्भात प्रतिक्रिया देताना जोरगेवार ह्यांनी सांगितले की आपण शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ह्यांच्या संपर्कात होतो मात्र आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आपण कुणाला समर्थन द्यायचे ह्याचा निर्णय घ्यायचा असल्याने आपण आधी मतदार संघात आलो. आपल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी तसेच मतदारांशी संपर्क करून त्यांचे मत जाणुन घेतले व सर्वांच्या इच्छेने आपण शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
0 comments:
Post a Comment