Ads

परवाना केवळ एक हजार ब्रासचा वापर अंदाजे पाच हजार ब्रासचा, ए.जी कंट्रक्शन कंपनीचे काम;

गोंडपिपरी :-गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे ते आष्टी मार्गाचे काम करणाऱ्या ए. जी कंट्रक्शन कंपनीने आतापर्यंत अंदाजे ५००० ब्रास मुरमाचा वापर केला असून शासनाचा लाखोंचा महसूल बळवला असल्याचा आरोप करत चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांनी केली आहे.
नवेगाव वाघाडे ते आष्टी मार्गाचे काम करणाऱ्या ए. जी कंट्रक्शन कंपनीला केवळ 1000 ब्रास मुरूमLicense to use brass Red Soil वापरण्यासाठी परवाना मिळाला असल्याची माहिती (माहिती अधिकारातून) मिळाली.परंतु त्या मार्गावर दुतर्फा रस्त्यावर रस्ता मजबुतीकरणासाठी वापरलेला मुरूम हा अंदाचे 5000 ब्रास असावा असा अंदाज असल्याने पंचनामा करून चौकशी करावी दोषी आढळल्यास कार्यवाही करावी सोबतच ज्या ठिकाणावर उत्खनन करण्याची परवानगी होती त्या ठिकाणावर देखील मोजमाप करावे अशी मागणी आज दि.23 गुरुवारी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
दिवस रात्र सदर कामावर मुरमाचा मोठा वापर करण्यात येत होता त्यामुळे कार्यवाही कडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment