ब्रम्हपुरी :- रानबोथली येथे आरोग्य निदान व उपचार शिबीर सध्या समुदायांचा एकूणच धकाधकिच्या जीवनात आरोग्यासंदर्भात दुर्लक्ष होताना दिसून येते व ऐन वेळेवर मोठ मोठे उपचार घ्यावे लागतात. त्यातही अश्या या महागाईच्या युगात महागड्या शस्त्रक्रिया व उपचार घेणे एका साधारण कुटुंबाला शक्य नसते. यातच
या सर्वांमध्ये महिला वंचित राहून जाते.
या सर्वांमध्ये महिला वंचित राहून जाते.
आम्ही आमच्या आरोग्यासाठी संख्या कुरखेडा, औरीअस इंस्टीट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस, नागपूर यांच्या वतीने रोगनिदान व उपचार शिबीर ५ जून २०२२ रोजी जुनी जि.प. शाळा रानबोथली येथे घेण्यात आले. शिबिराची सुरुवात आरोग्य, उपजीविका व सेंद्रिय पौष्टिक परसबाग यांचे महत्व सांगून पाहुण्याचे स्वागत करून झाली. या शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचे संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार व विश्वस्थ डॉ. मिनाताई शेलगावकर व नागपूर येथून औरीअस इंस्टीट्युट ऑफ मेडीकल सायन्सेस मधून आलेले प्रवीण मेश्राम तसेच डॉक्टर व त्यांची टीम होती. दरम्यान ब्रम्हपुरी तालुकातील एकूण ७ गावातील महिलांची, त्यामध्ये किशोरवयीन व वृद्ध महिला सुद्धा आरोग्य तपासणी करिता आलेले होते. आरोग्य तपासणी करून औषध उपचार करण्यात आले. ब्रम्हपुरी तालुक्यातील रानबोथली, सावरदंड, काटलीचक, चकबोथली तुलानमाल, तुलानमेंढा व धामनगाव इ. गावातील ११५ महीलांचा समावेश होता. औषधोपचार झाल्यानंतर प्रत्येक महिलेला घरघुती उपचार, रोजच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, पौष्टिक आहार व परसबागेचे अनन्य साधारण महत्व या विषयावर डॉ. मिनाताई सोलगावकर व डॉ. सतीश गोगुलवार यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराचे नियोजन करण्याकरिता संस्थेचे कार्यकर्ते रामदास मैंद, छाया खरकाटे, वैशाली शेंडे, तन्मय भोयर, भुजंग मडावी यांचे तसेच प्रतिज्ञा महिला शेतकरी गट, रानबोथली यांचे मोलाचे योगदान लाभले.
0 comments:
Post a Comment