ब्रह्मपुरी:- तालुक्यातील मेंडकी येथील तळोधी मार्गावरील गजानन पेट्रोल पंप येथून वाहनधारकांना पेट्रोल पंपावरून चक्क पेट्रोल ऐवजी पाणी वाहनांमध्ये भरली जात असल्याचा प्रकार काल रात्रीच्या सुमारास उघडकीस आला गजानन पेट्रोल पंपावरून पेट्रोल घेतल्यानंतर अनेकांची वाहने रस्त्यामध्ये बंद पडल्याने वाहनात पाणी असल्याचे आढळून आले. सदर पेट्रोल पंप हा प्रविण केशवराव शेंडे यांचा मालकीचा आहे .
रात्री साडे नऊच्या दरम्यान गजानन पेट्रोल पंप येथून पेट्रोल ऐवजी पेट्रोल सोबत पाणी येत असल्याची बाब निदर्शनास आल्याने मेंडकी येथील तरुणांनी याची महसूल विभागाला तक्रार केली रात्रीच्या सुमारास तहसील कार्यालयाची चमू गजानन पेट्रोल पंपावर दाखल झाली. अन्नपुरवठा अधिकारी राऊत यांनी रात्री पेट्रोलचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करता पाठविण्यात येणार असल्याचे नागरिकांनी सांगितले यावेळी तक्रार कर्त्यांचे बयान नोंदविण्यात आले दरम्यान येथील तक्रारकर्ते ज्ञानेश्वर लांजेवार, रवि जेल्लेवार, दिलीप अगळे, सुरज आंबोरकर, चिंतामण जेल्लेवार, राजेंद्र आंबोरकर ब्रम्हवार्ता चे प्रतिनिधी उपेंद्र बोरूले व मेंडकी येथिल नागरीक, युवकमंडळी उपस्थित होते. सलग दुसऱ्या दिवशीही महसूल अधिकारी यांनी पेट्रोल पंप घेऊन चौकशी केली पेट्रोल सोबत पाणी मिळत असल्याने गजानन पेट्रोल पंपाला चौकशी अधिकाऱ्यांनी सध्या स्थितीत पेट्रोल पंप सील केले असल्याचे प्रतिनिधीला सांगितले.
0 comments:
Post a Comment