चंद्रपुर :-अखिल भारतीय कॉंग्रेस कमेटी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी, जिल्हा व तालुका कॉंग्रेस वं कमेटी स्तरापर्यंत कॉंग्रेसचे संघटन अधिकाधिक मजबुत करण्यासाठी कॉंग्रेसचा एक एक कार्यकर्ता सक्षम असून येत्या काळात सर्व स्तरावर कॉंग्रेसची सत्ता दिसेल यात तिळमात्र शंका नाही असे प्रतिपादन चंद्रपूर - वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी वरोरा येथील जनसंपर्क कार्यालयात ब्लॉक रीटर्नीग ऑफीसर्स च्या बैठकीत केले.
कॉंग्रेस पार्टीच्या अंतर्गत संघटनात्मक निवडूणकांचा कार्यक्रम सुरु आहे. डिजिटल सदस्य नोंदणी अभियान देखील गाव पातळीपर्यंत जोमाने सुरु आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय पासवान यांनी चंद्रपूर जिल्हयात कॉग्रेसने एक खासदार व दोन विधानसभा तसेच एक विधान परिषद काबीज केल्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.
आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी पुढील स्थानिक स्वराज्य संस्था कॉंग्रेसकडे पुर्णपणे खेचून ●आणू असा आत्मविश्वास प्रगट करीत कार्यकर्त्यांना जोमाने कार्य करण्याचे आवाहन केले.
या बैठकीत खा. बाळूभाऊ धानोरकर, संजय पासवान, आ. प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, सुरज गावंडे, मिलिंद भोयर, यशोदाबाई खामनकर, वर्षाताई ठाकरे, छोटूभाऊ शेख, निलेश भालेराव, राजु चिकटे, राहूल ठेंगणे, सुधीर मुडेवार, इत्यादी पक्षाधिकारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment