Ads

सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ - कामाच्या फलकाने संभ्रम.

सिंदेवाही प्रतीनिधी:-जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका लवकरच होऊ घातलेल्या आहेत. हे लक्षात ठेवून विविध ठिकाणी भूमिपूजन चा सपाटा सुरू झालेला आहे. अशाच प्रकारे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या घोषित दौऱ्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ समोर आलेला आहे. घाईघाईने लावलेल्या या फलकामध्ये काम सुरू करण्याच्या तारखेच्या आधी काम पूर्ण झाल्याची तारीख दर्शविली आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी यांच्या कुणाच्याही लक्षात न येता हा फलक रोडवर लागलेला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचा दौरा लक्षात घेऊन घाईने लावलेल्या या फलकाची सर्वत्र चर्चा आहे.
सविस्तर वृत्त असे की सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव ते पवनपार टेकरी व सावरगाटा गुंजेवाही या गावांना जोडणारा रस्ता पूर्णपणे उखडला गेलेला आहे. अनेक वर्षापासून या परिसरात राहणाऱ्या लोकांनी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केलेली आहे परंतु रस्ता दुरुस्तीचा मुहूर्त मिळाला नव्हता. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच होऊ घातलेल्या असल्यामुळे या रस्त्याचा मुहूर्त निघाला. पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांचा दौरा असल्याने प्रशासकीय विभाग जागा झाला व घाईघाईने माहितीचा फलक जुन्या फलकावर लावण्यात आला. परंतु फलका मध्ये असलेला तारखेचा घोळ कुणाच्याही लक्षात आलेला नाही त्यामुळे सध्या हा फलक चर्चेचा विषय बनलेला आहे. द्विवार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे या अंतर्गत २४,९४,०६४ रू. चा निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला. दोष निवारण करण्याचा कालावधी 24 महिने फलकावर दर्शविण्यात आलेले आहे. सदर काम गडचिरोली येथील कंत्राटदार प्रविण वासुदेव तामसेटवार यांना मंजूर झालेला आहे. काम सुरू करण्याचा दिनांक एक 12 फेब्रुवारी 2022 दर्शविलेला असून का काम पूर्ण करण्याचा दिनांक 11 फेब्रुवारी 2022 दर्शविला आहे. रस्त्याचा काम 12 फेब्रुवारीला सुरू होत आहे मग 11 फेब्रुवारीला काम कसा पूर्ण होईल असा प्रश्न विचारल्या जात आहे. काम सुरू करण्याचा दिनांक पासून चार महिने लोटत आहेत परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही त्यामुळे खरंच हा फलक सार्वजनिक बांधकाम विभागाने लावला की लोकांना मूर्ख बनवल्या जात आहे असाही प्रश्न विचारला जात आहे. काहीही असला तरी या फलका मुळे नागरिकांचे भरपूर मनोरंजन होत आहे हे मात्र निश्चित.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment