भद्रावती : विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालय, भद्रावती येथे शारीरिक शिक्षण विभाग तथा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या तर्फे आज दिनांक २१ जून २०२२ आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.International Yoga Day celebrated at Vivekananda College
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे सर होते. प्रमुख पाहुणे व योग प्रशिक्षक म्हणून पंतजली योग समिती, भद्रावती चे सदस्य विपुल ठक्कर आणि पंतजली महिला योग समिती चा सदस्या सरिताताई सातपूते व शिलाताई तुराणकर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात योगासने व प्राणायाम नियमित केल्याने स्वास्थ्य निरोगी राहते आणि रोग प्रतिकारशक्ती अधिक चांगली राहते असे सांगितले. तसेच योग प्रशिक्षक विपुल ठक्कर यांनी आपल्या भाषणातून अष्टांगयोग यावर प्रकाश टाकला. सभागृहातील उपस्थित सर्वांनी आसने व प्राणायाम केले यामध्ये ताडासन, वूक्षासन, त्रिकोणासन, भद्रासन, वजासन, हलासन, मकरासन, सर्वांगासन, गरुडासन तसेच कपालभाती, भस्त्रीका, शितली, अनुलोम विलोम इत्यादी प्राणायाम केले. आणि योग प्रशिक्षक सरिताताई सातपूते व शिलाताई तुराणकर यांनी योगासनांची प्रात्यक्षिके करुन दाखविली. हा कार्यक्रमात कोव्हीड -१९ च्या सर्व नियमांचे पालन करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संगिता आर. बांबोडे मैडम, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख यांनी केले तसेच सुत्रसंचालन प्रा. डॉ. रमेश पारेलवार यांनी केले आभार प्रा. डॉ. उत्तम घोसरे , कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना यांनी मानले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment