भद्रावती(तालुका प्रतिनिधी):-आपला देश संपूर्ण जगात विशाल लोकतंत्र असलेला देश आहे. विविधता आपल्या देशाची सुंदरता आहे. विविध संस्कृतीला मानणारे समूह एकत्र राहून राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता बाधित न करता धर्मनिरपेक्ष वातावरण आपल्या देशात आहे.
परंतु मागील काही वर्षापासून देशातील सौहादपूर्ण वातावरण बिघडविण्याचे कार्य मनसोक्त सुरु आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा ह्यांनी मोहम्मद पैगंबर (स.अ.) साहेब यांच्यावर विवादित टिप्पणी करून इस्लाम धर्माला मानणा-या मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना खूपच दुखावल्या.
या विवादित टिप्पणीचे पडसाद केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पहायला मिळत आहे. संपूर्ण जगातील मुस्लिमांनी यावर निषेध करत आक्षेप नोंदविला आहे.
धर्माबद्दल (कोणत्याही) विवादित टिप्पणी करणा-यांच्या विरोधात एक कडक कायदा करावा आणि मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांना कडक शिक्षा देण्यात यावी,Punish BJP's suspended Nupur Sharma and Naveen Jindal severely अशी मागणी महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे समस्त मुस्लीम महिला संघ, भद्रावती यांनी निवेदना द्वारे केली आहे
0 comments:
Post a Comment