Ads

ओबीसी व विदर्भवादी चळवळीतील दमदार कार्यकर्ता : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपुर :- सामाजिक चळवळीसाठी तळमळ ठेवून सातत्यपूर्ण व अभ्यासपुरक काम करणारी माणसं समाजात फार कमीच आहेत. मात्र या कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे ओबीसी व विदर्भवादी चळवळीतील दमदार कार्यकर्ता डॉ. अशोक जीवतोडे या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने... विदर्भातील सक्रिय सामाजिक जीवनात राबणारा प्रत्येक व्यक्ती डॉ. अशोक जीवतोडे यांना ओळखतो तो त्यांच्या कार्यानि...

दिनांक ११ जून १९६१ ला अशोकभाऊंचा जन्म चंद्रपूर येथे झाला. शिक्षणमहर्षी स्व. श्रीहरी जीवतोडे गुरुजींचा वारसा चालविणारे त्यांचे चिरंजीव अशोकभाऊ यांचा आज वाढदिवस. आपल्या व्यक्तिमत्वातून इतरांना सतत प्रेरणा देणा-या अशोकभाऊंचा वाढदिवस हा हजारो बहुजन लोकांसाठी विशेष दिन.
अशोकभाऊंचे शिक्षण एम. कॉम., एम.एड., एम. फील. (वाणिज्य), एम. ए. (अर्थशास्त्र), पी. एचडी (शिक्षणशास्त) व पी.एचडी. (वाणिज्य) पर्यंत झालेले आहे. अनेक जर्नल्समधे त्यांचे विविध विषयांवरचे लेख प्रकाशित आहेत. चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या विदर्भातील जुन्या व मोठ्या शैक्षणिक संस्थेचे ते मागील 30 वर्षांपासून सेक्रेटरी आहेत.

ओबीसी चळवळ
गेल्या दोन दशकापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून विदर्भात ओबीसी चळवळ सक्रिय करण्याचे कार्य प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले. ओबीसी समाजातील विविध जातींना एकत्रित आणून व जिल्ह्यापासून तर तालुका व गावपातळीपर्यंत ओबीसी समाजाच्या कार्यकारिण्या स्थापन करण्यात आल्या. अधिवेशन, संमेलन, व्याख्यान, बैठका, आंदोलन, मोर्चा, निवेदन या माध्यमातून ओबीसींच्या न्याय मागण्यांसाठी प्रखर लढा उभा केला. दिनांक ८ डिसेंबर २०१६ ला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर ओबीसी समाजाचा 'न भूतो न भविष्यती' मोर्चा काढण्यात आलेला होता. यामधे चंद्रपूर जिल्ह्यातून हजारो समाजबांधव स्वयं: स्फुर्तीने सहभागी होते. या मोर्चाचा परिपाक म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राज्य शासनाने ओबीसी समाजाकरीता स्वतंत्र ओबीसी खाते स्थापन केले. हे डॉ. अशोक जीवतोडे यांच्या जनजागृतीचे फलीत म्हणावे लागेल. अशोकभाऊंच्या नेतृत्वात विदर्भातून शेकडो ओबीसी बांधव दरवर्षी नागपूर, दिल्ली, मुंबई, हैदराबाद आदी विविध ठिकाणी होत असलेल्या अधिवेशनाला हजेरी लावत असतात. या अधिवेशनाच्या आयोजनात अशोकभाऊंचा मोठा
सहभाग आहे. मुंबई व हैदराबाद येथील राष्ट्रीय अधिवेशनाचे अशोकभाऊ हे अध्यक्ष राहीले आहे. अधिवेशन ही देशभरातील ओबीसींना एकत्र आणण्याचे व ओबीसींच्या मागण्या शासनापुढे रेटण्याचे माध्यम आहे. असे ते मानतात.

देशात मंडल आयोगाविरोधात कमंडल आंदोलन झाले त्यावेळी राज्यात मा. शरद पवार हे मुख्यमंत्री होते. शरद पवार साहेब हे त्यावेळी ओबीसींच्या बाजूने होते. मंडल आयोगाच्या माध्यमातून त्यांनी ओबीसींना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. या घटना अशोकभाऊंना त्यांच्या चळवळीत प्रेरणा देणाऱ्या ठरल्या. अखेरच्या श्वासापर्यंत ओबीसींचा लढा तेवत ठेवू हा त्यांचा प्रण आहे..
विदर्भ विकास चळवळ
अशोकभाऊनी स्वतंत्र विदर्भ राज्य, विदर्भाचा संपूर्ण विकास व्हावा, यासाठी नागपूर ते चंद्रपूर, यवतमाळ ते गडचिरोली ढवळून काढलं, विदर्भ चळवळीतला आजपर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम चंद्रपूर मंधे अशोकभाऊंनीच लावला. विदर्भासाठी मतदान प्रक्रियेत पूर्णतः सहभाग घेतला. दरवर्षी १ मे ला विदर्भ राज्याचा प्रतिकात्मक झेंडा हजारो विदर्भप्रमीसमक्ष फडकावितात. विदर्भ राज्य व्हावे व विदर्भाचा सर्वांगीण विकास व्हावा हा त्यांचा ध्यास आहे.

सामाजिक कार्य

चळवळी सोबतच सामाजिक क्षेत्रात अशोकभाऊंची पकड आहे. पर्यावरणपूरक वृक्षलागवड, भव्य रक्तदान शिबिर, जनजागृतीपर भव्य कीर्तनाचे व व्याख्यानाचे कार्यक्रम, व्यसनमुक्ती कार्यक्रम, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन, स्वतंत्र विदर्भ राज्याची चळवळ, ओबीसी समाज चळवळ, पूर्व विदर्भात सक्रियरित्या चालवीत आहेत.

एखादे काम हाती घेतले की ते भव्यदिव्यच होऊ द्यायचे, व यशस्वी करून दाखवायचे, ही त्यांची ख्याती बनली आहे. समाजकार्यासाठी साधारणतः खिशातून शंभर रुपये काढायला कुणी तयार नसते. मात्र अशोकभाऊ सामाजीक कार्यावर हजारो-लाखो रुपये खर्च करतात. यासाठी कधी कुणाला पैसा मागितला नाही. अशी अशोकभाउंची ख्याती आहे.

भाऊंच्या वाढदिवशी त्यांना अनंत कोटी शुभेच्छा.. त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो...! हीच या वाढदिवशी प्रार्थना..!

- प्रा. रविकांत वरारकर जनता महाविद्यालय, चंद्रपूर
Mob.: 9975212721
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment