Ads

पिक विमा काढण्याचे कृषी विभाग भद्रावतीचे शेतकऱ्यांना आवाहन

भद्रावती : तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विम्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पीक विमा काढावा. तालुका कृषी अधिकारी भद्रावती यांचे शेतकरी बांधवांना आवाहन.
Agriculture Department Bhadravati appeals to farmers to take out crop insurance
यंदाच्या साली खरीप हंगामात शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा लागू करण्यासाठी धान, सोयाबीन, कापुस, तरू इत्यादी पिकांचा समावेश केलेला आहे.
पीक कापुस,शेतकरी हिस्सा प्रति हेक्टरी 2787.50, संरक्षित रक्कम 55,750/-, सोयाबीन- शेतकरी हिस्सा प्रति हेक्टरी 1055.00, संरक्षित रक्कम 52750/-,धान शेतकरी हिस्सा प्रति हेक्टरी - 955.00, संरक्षित रक्कम 47,750/-, तरू -शेतकरी हिस्सा प्रति हेक्टरी -736.04, संरक्षित रक्कम 36802/- एवढी असणार आहे.

कर्जदार व बिगर कर्जदार इच्छुक असुन त्यासाठी लागणारे कागदपत्र हे आधार कार्ड, सातबारा, नमुना आठ अ, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रासह जवळच्या बँकेत किंवा CSC सेंटरवर जाऊन शेकऱ्यांनी ३१ जुलै पर्यंत पिक विमा काढावा. अधिक माहिती करिता तालुका कृषी अधिकारी, मडंळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी
सहाय्यक, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याशी सपंर्क साधावा.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment