Ads

माजरी पोलीस ठाणे २४ तासांपासून पाण्यात; भद्रावती व वरोरा तालुक्यातील अनेक गावे पुराखाली

चंद्रपुर :-अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडल्यानंतर वर्धा नदीला पूर आला आहे. भद्रावती व वरोरा तालुक्यातील अनेक गावे पुराखाली आहेत. Many villages in Bhadravati and warora talukas under chandrapurflood माजरी येथील पोलीस ठाण्यात पाणी शिरले असून पोलीस कर्मचारी ठाण्यातील कागदपत्रे व साहित्य सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.Majri Police Station under water for 24 hours;
वर्धा नदीच्या वरच्या भागातील धरणांमधून प्रचंड विसर्ग
चंद्रपूर जिल्ह्यात ४८ तासांत पासून नसला तरी वर्धा नदीच्या वरच्या भागातील धरणांमधून प्रचंड विसर्ग होत असल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. माजरी येथील अख्खे पोलीस ठाणे पुरात बुडाल्यानंतर प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले आहे.. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज -अहिर यांनी बुधवारी या भागाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली.

फर्निचर तथा इलेक्ट्रिक साहित्पाण्या मुळे खराब
माजरी पोलीस ठाण्यातील फर्निचर तथा इलेक्ट्रिक साहित्य पुरामुळे खराब झाले आहे. २४ तासापेक्षा अधिक काळ पोलीस ठाणे पाण्यात आहे. तसेच या भागातील असंख्य घरे व इतर शासकीय इमारती पाण्याखाली आहेत. चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यात लष्कराचे १ पथक, 'एनडीआरएफ'चे १ पथक,दोन टीम व स्थानिक टीमच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment