भद्रावती :-दिनांक १८ रोजी दुपारी १ वा वर्धा नदीची पातळी अचानक वाढल्यामुळे पिपरी कडून कोची गावाकडे जाणाऱ्या नाल्यावर अचानक पाणी वाढले त्यामुळे नागरिकांना गडबळीत गावाकडे परतावे लागले. गावातील शेतालागत अनेक नाले आहेत,त्यामुळे अचानक पाणी वाढत दिसताच नागरिकांना दूर वरून असलेल्य रस्त्याने पायपीट करत यावे लागले. नागरिकांना पाण्यातून जनावरांसोबत मार्ग काढावा लागला. त्यामुळे नागरिकांननी प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला आहे.
प्रशासनाकडून कुठलीही पूर्वसूचना न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करत पाण्यातून मार्ग काढावा लागला. २६ वर्ष लोटूनही अजूनही पूरग्रस्त गाव असेलल्या पिपरी गावातील मंजूर असलेला आपत्कालीन मार्ग निधीअभावी अपूर्ण आहे,हे नक्कीच संतापजनक प्रकार आहे.काही अनुसूचित घटना घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क राहून तत्काळ उपाययोजना करावी.श्री संदिप अण्णाजी कुटेमाटे अध्यक्ष अन्नदाता एकता मंच तथा माजी सरपंच
0 comments:
Post a Comment