Ads

शिक्षक मुख्यालयी नसल्याने जीबगाव ची केंद्र शाळा कुलूप बंद!

सावली :-सावली तालुक्यातील जीबगाव येथे जिल्हा परिषद ची 1 ते 7 वर्ग पर्यंत केंद्र शाळा असून या ठिकाणी कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे पूर आला तर येवू कशे म्हणत चक्क शाळेला चा सुट्टी देण्याचा प्रताप करण्यात आलेला आहे.Jibgaon's central school is closed because there is no teacher headquarters!
सावली वरून येणाऱ्या जीबगाव नाल्याल पूर आले असल्यामुळे हा मार्ग बंद आहे.जिल्हा परिषद ची शाळा सुरू आहे.फक्त सद्या हाच मार्ग बंद आहे मात्र इतर मार्ग हे सुरू आहे.पण सावली मार्ग जीबगाव ला जाणारा मार्ग बंद असल्याचे कारण पुढे करून आज शाळेला सुट्टी असे स्वतःच जाहीर करून शाळेला सुट्टी देण्यात आल्याने शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

जीबगाव येथे एक ते सात पर्यंत विद्यार्थी आहे.मात्र शाळा सुरू असतानाच विद्यार्थी खेळत आहे म्हणून ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपेल्लीवार हे व त्यांच्या सोबत काही पालक खेळणाऱ्या विध्यार्थ्यांची विचारणा केली असता पुरा मुळे शाळेला सुट्टी आहे .शिक्षक शाळेत हजर नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी खेळत असल्याची माहिती विद्यार्थ्यांकडून मिळाली.या संदर्भात तसे काही आदेश आहेत का म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता असे शाळा बंद चे काहीच आदेश नाही असे कळविले.

मात्र आदेश नाही व मुख्यालयी राहत असल्याचे दाखवून मुख्यालयी न राहता शाळा बंद ठेवणे हा प्रकार योग्य नाही याची दखल घेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी मागणी पालकांनी केली आहे.


सध्या पावसाचे दिवस सुरू असून शेतात रोवणी साठी पालक जातात व विद्यार्थी हे शाळेत गेले आहेत असे समजून घेत असतात मात्र इकडे तसे काही होतांना दिसत नसून विद्यार्थ्यांचे मोठी नुकसान होत आहे तरी याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच मुख्यालय राहण्याचे आदेश काढण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपेल्लीवार यांच्या सह पालकांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment