Ads

विदर्भातील विद्यार्थ्यांनी दिपकच्या कर्तुत्वातून प्रेरणा घ्यावी : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपुर :चेव्हणींग ग्लोबल लीडर बनून एड. दीपक चटप यांनी विदर्भातील विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा केला आहे. विदर्भातील विद्यार्थ्यांनी दिपकच्या कर्तुत्वातून प्रेरणा घ्यावी. विदर्भाच्या भूमीत अनेक कर्तबगार युवक आहेत. त्यांनी जगासमोर आपले नाव कमवावे, असे मत डॉ. अशोक जीवतोडे यांनी सत्कार कार्यक्रमात मांडले. यावेळी त्यांनी दिपकला शुभेच्छा दिल्या.Students of Vidarbha should take inspiration from Deepak's work: Dr. Ashok Jivatode

चेव्हणींग ग्लोबल लीडर एड. दीपक यादवराव चटप यांचा जाहीर सत्कार आज (दि.१८) ला स्थानिक जनता शिक्षण महाविद्यालयाच्या 'श्रीलीला सभागृहात' पार पडला. जगातील १६० देशांतून ब्रिटिश सरकारची ४५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळविनारे देशातील पहिले तरुण वकील ठरल्याबद्दल एड. दीपक चटप यांचा सत्कार चांदा शिक्षण प्रसारक मंडळ तथा जनता परिवारा तर्फे करण्यात आला.
यावेळी सत्कार सोहळ्याला एड. वामनराव चटप, विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, प्राचार्य डॉ. एम. सुभाष, उपप्राचार्य सौ. कविता रंगारी आदी उपस्थित होते.
ज्यांना का जगायचं हे माहीत असतं त्यांना कस जगायचं हा प्रश्न उरत नाही. मला काय करायचं हे माझं ध्येय लक्षात होत, त्या पध्द्तीने मी कार्य करीत होतोच, मात्र ही शिष्यवृत्ती माझ्या मार्गात प्रेरणा देणारी आहे, असे मत सत्काराला उत्तर देताना एड. दीपक चटप यांनी मांडले.
यावेळी उत्कृष्ट संसदपटू तथा माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांनी बोलतांना सांगितले की, मनुष्य हा स्वतःच्या आयुष्याचा कर्ता असतो, आता स्पर्धा या जागतिक स्तरावरील झाल्या आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावरील स्पर्धेला युवकांनी तयार व्हावे लागेल. संगणक, आत्मविश्वास, स्पर्धा, चारित्र्य, संविधानाची जाण या गुणांनी प्रत्येकाला यश संपादित करता येते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. रविकांत वरारकर यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment