कोरपना प्रतिनिधी :– वणी कडून येणाऱ्या अल्टोला कोरपना कडून जाणाऱ्या स्कार्पि ओनी समोरसमोर जोरदार धडकScorpi oni going Alto with a strong frontal torso दिल्याने एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील
पारधीगुडा फाट्या जवळील तालुका क्रीडा संकुल समोर घडली.
यात स्वप्निल संदेश इटनकर (अंदाजे २१ वर्ष) रा. कोरपना याचा जागीच मृत्यू झाला. तो वणी वरून आपल्या अल्टो जी जे १० ए सी ५७३४ या वाहनाने कोरपना कडे येत होता. तर स्कार्पिओ एम एच ३८ ४३८३ हे वाहन कोरपना कडून वणी कडे जात होते. यात दोघे गंभीररित्या जखमी झाले. त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

0 comments:
Post a Comment