Ads

भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या समन्वयक पदी ज्ञानेश्वर डुकरे .

भद्रावती :- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व सचिव अनिल देसाई, विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम व भद्रावती वरोरा विधानसभा संपर्कप्रमुख संजय काळे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जीव तोडे यांच्या सूचनेनुसार भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राच्या शिवसेना समन्वयक पदी वरिष्ठ शिवसेना नेते ज्ञानेश्वर डुकरे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीमुळे या भागातील शिवसेना अधिक बळकट होईल असा विश्वास वरिष्ठांकडून व्यक्त केला आहे. डुकरे यांनी या आधी नगराध्यक्ष ,शेतकरी खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष, भद्रावती तालुका नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष, भद्रावती विविध कार्यकारी संस्था संचालक असे विविध पदे भूषविलेले आहे .आता क्षेत्रातील शिवसेनेच्या आजी-माजी वरिष्ठ व नवीन पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन मी शिवसेना वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
ज्ञानेश्वर डुकरे यांच्या निवडीबद्दल वसंता मानकर, किसन पत्तीवार ,विकास डुकरे, राहुल बावणे, दिनेश पढाल ,दिलीप पारखी ,हनु पारधे, नगरसेवक राजू सारंगधर ,पप्पू सारवन ,महेश जीवतोडे,सुनील सोनुले, तेजकरन बदखल, रवी कटारे ,गुणवंत बुरडकर, मनोज नेताम आदींसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment