चंद्रपूर:- धनराज कोवे मित्रपरिवार, मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व परिवार विकास फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 4 सप्टेंबर 2022 ला दुपारी 12-00 वा. पासून ते दुपारी 4-00 वाजेपर्यंत निशुल्क रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिर जय बजरंग बली बाल गणेश मंडळाच्या पेंडाल मध्ये घेण्यात आले.
शिबिराचे उदघाटन श्री. दिनकरजी सोमलकर यांच्या शुभ हस्ते पार पडले तर श्री. राजेशजी सोलापन,श्री. बन्सीधर तिवारी,डॉ. गिरधरजी येडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. शिबिरात स्त्रीरोग, अस्थिरोग,बालरोग, जनरल तपासणी, दंतचिकित्सा,त्वचारोग व बीपी या सर्व प्रकारच्या रोगाची तपासणी मोफत करण्यात करण्या साठी महानगरातील प्रसिद्ध डॉक्टर डॉ. माधुरी मानवटकर- जनरल सर्जन, डॉ. उल्हास बोरकर- अस्थिरोग तज्ञ, डॉ. शैलेश वांदिले- बालरोग तज्ञ,डॉ. निश्चिता मॅडम- जनरल फिजिशियन,डॉ. दीपक चव्हाण- दंतरोग तज्ञ, डॉ. विना बनसोडे- त्वचारोग तज्ञ आणि नर्स व सहकारी यांची उपस्थिती होती. डॉ. मानवटकर यांनी समाजातील गरीब जनते साठी मोफत रोग निदान शिबीर घेतल्यास पैश्या अभावी तपासणी घेण्यास वेळ लवणाऱ्यांचे लवकर निदान होऊन पुढे होणारे मोठे धोके टाळता येतात असे सांगितले तसेच उपस्थितांना सोलापन यांनी धनराज कोवे मित्र परिवार, परिवार विकास फाउंडेशन,जय बजरंग बली बाल गणेश मंडळ यांचे कौतुक केले व सांगितले की बाकी अनेक गणेश मंडळानी असे सामाजभिमुख उपक्रम राबविल्यास गरीब जनतेची सेवा होऊ शकते मी धनराज कोवे मित्र परिवार मागील अनेक वर्षा पासून समाजात सामाजिक,सांस्कृतिक,आर्थिक,शैक्षणीक अनेक उपक्रम राबवित असल्याचे बघत आहे. असे मार्गदर्शनात सांगितले. इंदिरानगर, संजय नगर, कृष्ण नगर परिसरातील जनतेने शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. शिबिराचे आयोजन- धनराज कोवे,पप्पू बोपचे,परिवार विकास फाउंडेशन चे संचालक महेश भंडारी,हेमंत त्रिवेदी,संयोजक- रुद्रनारायण तिवारी,प्रलय सरकार,संजय पटले, आकाश मस्के,सौ.वर्षा सोमलकर,माजी नगरसेविका सौ.चंद्रकला सोयम,सौ.जयश्री जुमडे,सौ.वंदना जांभूळकर,जय बजरंग बली समिती चे अध्यक्ष बबनजी कोसरे,सौ.रेखा मडावी,सौ.नीलिमा आत्राम, यांनी केले. तर शिबिराचे यशस्विते साठी अनिल मंचर्लवार,गजू राऊत, अमोल चांदेकर,रोहित मडावी,विनय मडावी,मनोज जीवतोडे,राहुल जाधव,नितीन कोसरे, तुषार पांढरे,गणेश पंधरे,गजू मने,आनंद जागंळे,राहुल रामटेके,सोनू तुरील,मयंक बघेले,राकेश दिकोंडावार,पुलकित बोरकर,आदित्य कुंभेकर, यांनी अथक परिश्रम घेतले.
0 comments:
Post a Comment