ब्रम्हपुरी:- 5 सप्टेंबर हा दिवस सर्व भारतभर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ पॉलिटेक्निक, बेटाळा इथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला आदरांजली देऊन शिक्षक दिन साजरा करण्यात याला या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आपके मनोगत प्रामुख्याने वेक्त करीत शिक्षकांच्या प्रति आदर कसा बाळगावा व शिक्षकाची परिभाष्या आपल्या मनोगतामधून वेक्त केली.Teacher's Day Celebration at Maharashtra Institute of Polytechnic, Betala
कार्यक्रमाला संस्थेचे प्राचार्य प्रा.सुयोग वा.बाळबुधे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुलांना सांगताना बोलले शिक्षक हा झाडासारखे असतो सदैव आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाच्या सावलीत कायम ठेवतात. या प्रसंगी यंत्र विभागाचे विभागप्रमुख प्रा नरेंद्र समर्थ,स्थापत्य विभागाचे विभागप्रमुख प्रा.असद शेख आणि विद्युत शाखेचे विभागप्रमुख प्रा.रुपेश ढोरे यांनी सुद्धा आपले मनोगत वेक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन मानवता व विज्ञान विभागाचे प्रा.गिरीश साखरे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन द्वितीय वर्षातील निखिल सहारे यांनी केले आभार प्रदर्शन द्वितीय वर्षातील विपुल सहारे याने केले.
कार्यक्रमाला संस्थेतील सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

0 comments:
Post a Comment