वरोरा (प्रती ) :-काही दिवसापूर्वी टेंमुर्डा येथील कार्यालयात वनपरिक्षेत्राधिकारी एम पी राठोड यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून चाकूने भोसकून टाकीन अशी धमकी वनरक्षक संदीप वाटेकर यांना दिली होती , वाटेकर यांनी राठोड यांच्या विरोधात पोलिसात तसेच वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती या प्रकरणाची वरिष्ठाकडे चौकशी सुरू असताना काल रात्रीच्या सुमारास तीन अज्ञात हल्लेखोरांनी संदीप वाटेकर यांना वाटेत अडवून त्यांच्यावर चाकूचा प्राणघातक हल्ला केला.Assault with a knife
या हल्ल्यानंतर एकच खळबळ उडाली, असून सदर हल्ला हा वरोऱ्याचे वादग्रस्त वनपरिक्षेत्रधीकारी राठोड यांच्याच इशाऱ्यावर केल्याचा आरोप वनपाल व वनरक्षक तसेच खुद संदीप वाटेकर यांनी केला , त्यामुळे वनपाल व वनरक्षक कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत
१४सप्टेंबर रोजी टेंमुर्डा कार्यालयात वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी वनरक्षक संदीप वाटेकर यांना अर्वाच्य शिवीगाळ करून व चाकूने भोसकून काढीन अशी धमकी दिली होती संदीप वाटेकर यांनी याबाबत पोलिसात तसेच विभागाच्या वरिष्ठाकडे तक्रार दाखल केली होती, सदर तक्रारीवरून राठोड यांचे बयान सुद्धा वरिष्ठांनी घेतल्याची माहिती हाती आली आहे, काल दि२८/०९/२२ रोजी रात्रीच्या ९:१५ च्या सुमारास संदीप वाटेकर हे घरी जात असतांना त्यांच्यावर तीन अज्ञात इसमांनी चाकूने हल्ला करून त्यांना जखमी केले, ते हल्लेखोर हिंदी मध्ये संभाषण करीत होते आणि वाटेकर यांना पेनड्राईव्ह मागत होते असे पोलीस तक्रारीत म्हटले आहे,
अज्ञातावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला परंतु सदर हल्ला हा राठोड यांच्या इशाऱ्यावरच केल्याचा आरोप वनपाल वनरक्षक संघटनेने केला असून खुद संदीप वाटेकर यांनी सुद्धा केला आहे, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्य वनरक्षक चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर यांनी एम पी राठोड यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवल्या जात असल्याची माहिती हाती आली आहे,त्यांच्या जागेवर भद्रावती येथील वनपरिक्षेत्राधीकारी हरिदास शेंडे हे रुजू होणार असून त्यांच्या कडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.आर एफ ओ राठोड
यांच्यावर वन प्रशासन यांनी तात्काळ कारवाई न केलेल्या वनरक्षक संघटनेचा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
0 comments:
Post a Comment