Ads

हत्याकांडाने आणि महिला अत्याचाराने हादरला वरोरा

वरोरा(प्रती) :-हत्या कांडाने आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून जनसामान्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, वरोरा शहरालगत असलेल्या बोर्डा येथे दि.२/९/२०२२रोजी बापानेच आपल्या पोटच्या गोळ्याला विष पाजून त्यांची हत्या केली व स्वतःही बापाने आत्महत्या केली, या घटनेची शाई वाळते न वाळते दि,५/९/२०२२रोजी एकाने मेडिकल मध्ये काम करणाऱ्या महिला फार्मासिस्टचा विनयभंग केला.
आरोपीला अटक करून जामिनावर त्याची सुटका करण्यात आली, अगदी बारा तासाच्या आताच शहरात एका वकिली करणाऱ्या वकील महिलेचा विनयभंग Woman lawyer molested करण्यात आला, सदर वकील महिला ह्या डोंगरवार चौकातील जैन मंदीराच्या बाजूला राहतात,घराच्या खालच्या भागात कपड्याचे दुकान असून वरच्या मजल्यावर ते आपल्या परिवारासोबत वास्तव्यात आहेत, त्यांच परिसरात आरोपी संदीप चटकोजवर हा आपल्या आई सोबत राहतो, गेल्या दिवाळी मध्ये आरोपी दुकानात लावलेल्या काचेतून एकसारखा सदर वकील महिलेकडे पाहत होता,आणि तीन चार महिन्या आधी सदर महिला दुचाकीने घरी जात असतांना त्यांच्याकडे पाहून हातवारे करत होता, व हसत होता, दि,६/९/२०२२रोजी सायंकाळी ७;३० वाजताच्या दरम्यान महिला वकील आणि त्यांचे पती हे दोघेही दुकानात असतांना आरोपी संदीप चटकोजवर तेथे आला व महिला वकिलाकडे एकसारखा पाहू लागला, व हसू लागला, असे पोलीस तक्रारीत नमूद आहे सदर महिलेने पोलिसात धाव घेऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली ,पोलिसांनी आरोपी संदीप विरोधात कलम ३५४चा नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नसून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत , तीन-चार दिवसांपूर्वीच झालेल्या हत्या कांडाने आणि अगदी बारा तासाच्या आत झालेल्या महिलांवरील विनयभंगाने एकच खळबळ उडाली आहे,The molestation caused an uproar
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment