सिंदेवाही प्रतीनिधी:-आदिवासी मुलींचे वस्तीगृह सिन्देवाही येथील महिला गृहपाल चार-पाच महिण्या पासुन प्रसुती रजेवर आहेत.महिला गृहपाल रजेवर गेल्यापासुन वस्तीगृहातील 38 मुलींची जबाबदारी महीला गृहपाला ऐवजी एखाद्या पुरुष गृहपालाकडे सोपविणे योग्य नाही.

Appoint a female housekeeper instead of a male housekeeper in the tribal girls' hostel at Sindevahi मुलींविषयी भविष्यात उद्भवना-या समस्या एक महिलाच समजू शकते. व त्या समस्या सोडविन्याचा प्रयत्नही महिलाच करू शकते.नैसर्गिक समस्या विषयी पर पुरूषा जवळ व्यक्त करणे अडचनीचे होत असुन मुलींच्या आरोग्याचा व संरक्षणाचा प्रश्न पुरूष गृहपालाची नियुक्ती करून ऐरणीवर टाकल्या गेला आहे. यावरूनच आदिवासी प्रकल्प कार्यालयाची बुद्धी ठिकाणावर नसल्याचे निष्पन्न होते.करीता मुलींच्या वस्तीगृहात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या पुरूष गृहपाला ऐवजी महिला गृहपालाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी मुरलीधर मडावी अध्यक्ष आदिवासी भाजपा आघाडी सिन्देवाही यांनी पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
0 comments:
Post a Comment